भावांच्या जमीनीवर ताबा सांगणार्‍या बहिणींचा मनाई हूकूम अर्ज न्यायालयाकडून खारीज

अ‍ॅड.गणेश एम. कोल्हे यांचा खंबीर युक्तीवाद ठरला निर्णायक

भावांच्या जमीनीवर ताबा सांगणार्‍या बहिणींचा मनाई हूकूम अर्ज न्यायालयाकडून खारीज
अ‍ॅड.गणेश एम. कोल्हे यांचा खंबीर युक्तीवाद ठरला निर्णायक
बीड । प्रतिनिधी
मानकुरवाडी येथील वादग्रस्त जमीन गट नं.274 मध्ये वडिलोपार्जित व भावंडाच्या जमीनीमध्ये विवाहित बहिणींनी ताबा वहिवाटीकरिता मागणी केलेला मनाई हुकूम अर्ज सह दिवाणी न्यायाधिश साहेब व.स्तर बीड यांचे न्यायालयात खारीज करण्यात आला आहे. यावेळी प्रतिवादी भावंडांंच्या वतीने न्यायालयात अ‍ॅड.गणेश एम कोल्हे यांनी भक्कम बाजू मांडली.
याबाबत माहिती अशी की, मौजे मानकुरवाडी ता.वडवणी जि.बीड येथील गट नं.274 मध्ये वादी लताबाई उमाजी जगताप व वृंदावनी परमेश्वर भुसारे या दोन सख्ख्या बहिणींनी वडिल पांडूरंग देवराव जाधव व सख्खे तीन भाऊ नामे जगन्नाथ, ईश्वर, शरद पि.पांडूरंग जाधव सर्व राहणार मौजे मानकुरवाडी ता.वडवणी जि.बीड यांचे विरुध्द जमीनीमध्ये ताबा वहिवाटीकरिता मनाई हूकूम अर्ज दाखल केला व सदरचा अर्ज मा.न्यायालयात दि.6 एप्रिल 2026 रोजी गुणवत्तेवर निष्कर्ष नोंदवून खारीज केला. सदर अर्ज खारीज करणेकामी प्रतिवादी भावंडांच्या वतीने बहिणींना मनाई हुकूम मिळू नये करिता विधीज्ञ अ‍ॅड.गणेश एम.कोल्हे यांनी मनाई हुकूम अर्जावरील गुणवत्तेवर जोरदार सबळ पुराव्यानिशी युक्तीवाद केला व सदर युक्तीवाद व पुरावे यांचे अवलोकन करुन मा.न्यायालयाने भावंडांच्या विरुध्द मागणी केल्याबाबतचा अर्ज खारीज करुन अ‍ॅड.गणेश एम कोल्हे यांच्या युक्तीवादाला ग्राह्य धरुन प्रतिवादींच्या हक्कामध्ये न्यायनिर्णय पारित केला.

Leave a comment

लक्ष्यवेध

इथे तुमची बातमी टाका