About Us

थोडेशे लक्ष्यवेध विषयी….
16 वर्षापुर्वी प्रेसलाईनमध्ये रुजु झाल्यामुळे शब्दांची बांधणी करायला मिळाली आणि हा 16 वर्षांचा प्रवास एखाद्या अलिशान कारच्या प्रवासापेक्षाही मनमुराद आनंद देणारा राहिला, त्यामुळेच कळले की सांस्कृतिक, राजकीय, क्राईम अशा वेगवेगळ्या विषयांवर लिखानाचा आनंद हा काही वेगळाच असतो. अशा लिखानाच्या कलेशी माझी मैत्री जमली त्या कलेला वाव देण्यासाठी आणि मनातील शब्द प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लक्ष्यवेध हे वाचकांच्या सेवेत परमेश्वराच्या, आई-वडिल, गुरुंच्या आशिर्वादाने सुरु केलेले आहे….
लक्ष्यवेध हे केवळ वाचकांसाठीच आहे, प्रत्येकाच्या मनाला बळ देणारे आहे, लिहिलेल्या काळ्या शाईने देखील पांढरा शुभ्र अर्थ निघावा असेच लिखान करणारे आहे, यामध्ये बातम्यांसोबत निवडक विचारांचे संकलन,समाजातील प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा, समानतेची भावना, लोकशाहीवरील निष्ठा, विद्यार्थ्यांच्या,शेतकर्‍यांच्या, महिला-भगिनी, गोर गरीबांच्या अडचणी या बरोबरच अन्यायावरील चीड व त्याविरुद्ध लढा देणे हा प्रामाणिक प्रयत्नच राहील हेच वाचकांना सांगणे…