जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाले संथगतीचे जिल्हा शल्य चिकित्सक ; रुग्णांना सेवा देणे सोडाच पण फोन देखील घेणे टाळले जाते

बीड (वृत्तसंस्था) ः– बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक बडे यांचे कामकामाची कार्यपद्धती ही नुसतीच ‘बडे’जाव पणाची असून रुग्णसेवेबाबतचे धोरण उदासिन असल्याचे यापुर्वीही अनेकदा दिसून आले तसेच ते जास्तकरुन गैरहजर असल्याचेच निदर्शनास आलेले आहे मध्यंतरी खा.बजरंग सोनवणे यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली असता त्यांनी तेथील रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी ऐकून तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बडे हे गैरहजर असल्याचे पाहून चांगलेच भडकले होते व रुग्णांच्या बाबतीत कर्तव्य बाळगा रुग्णसेवेत कसलेही दुर्लक्ष होता कामा नये अशी तंबी दिली होती. तसेच जिल्हा रुग्णालयातील विविध समस्या औषधांचा तुटवडा, रुग्णांसाठी होणारी गैरसोय बाबत तक्रार केली असता डॉ.अशोक बडे यांची फोन न घेण्याची पद्धत यामुळे जिल्ह्याच्या इतिहासात इतके संथगतीचे जिल्हा शल्यचिकित्सक पहिल्यांदाच मिळाले आहे अशी चर्चा नागरिकांत होतांना दिसून येत आहे.
बीड जिल्हा रुग्णालयाची स्थापना 1950 साली झाली आज रोजी 74 वर्षे जिल्हा रुग्णालयाच्या स्थापनेला होवून देखील रुग्णालयाची अवस्था दिवसेंदिवस सुधारण्याच्या ऐवजी खालावतेय. जिल्हा रुग्णालयात रुग्णांना बरेचशी औषधे नसतात, होमिओपॅथीक, आयुर्वेदिक विभाग सुरु केलेले आहेत परंतू एखाद्या रुग्णाने उपचार करुन औषधे मागितली असता त्याला अर्धी औषधे बाहेरुन घ्यावेत असे सांगितले जाते याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदने देवून विचारणा केली असता केवळ औषधांची मागणी केली आहे येतील काही दिवसात असे बोलून प्रश्नाला बगल दिली जाते परंतू त्यावर अंमलबजावणी डॉ.अशोक बडे यांच्याकडून होत नाही.
पहिलेच जिल्हा शल्यचिकित्सक साबळे अथवा थोरात बरे होती अशी चर्चा नागरिकांत होत असून त्यांनी डॉ.अशोक बडे यांचा कसलाही वचक जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांवर नाहीये असेच चित्र आजमित्तीला स्पष्ट होतेय. प्रकृती गंभीर असलेल्या पेशंटवर देखील वेळेवरच उपचार होत नाहीत रात्रीच्या वेळी कंत्राटी डॉक्टर असतात तज्ञ डॉक्टरांना फोन केला जातो तेंव्हा ते फोन घेण्यास टाळाटाळ करतात अशा घटना सातत्याने जिल्हा रुग्णालयात घडत आहेत. तसेच गंभीर रुग्णांच्या बाबतीत दुर्लक्ष झाल्याचे जिल्हा रुग्णालयात अनेकदा प्रकार डॉ.अशोक बडे यांच्याकाळात घडले आहेत त्यामुळे नागरिकांच्या मनात सरकारी दवाखान्यात उपचारासाठी जायला भिती बसली आहे अशा कारणाने एकेकाळी डॉ.गौरी राठोड, डॉ.थोरात, डॉ.साबळे यांच्याकाळात लोकांचा सरकारी दवााखान्यावर असणारा विश्वास आज रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक बडे गमावून बसल्याची चर्चा होत आहे.

Leave a comment