बीड । निवेदक
माजलगाव येथे आज दि.25 जुलै 2024 रोजी ओबीसी समाजाचा भव्य मेळावा होणार असून या मेळाव्यास प्रा.लक्ष्मण हाके आणि नवनाथ आबा वाघमारे हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत तरी या मेळाव्यास ओबीसी बंधु-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अहिल्या महिला आघाडीच्या प्रदेश सचिव मिनाक्षी देवकते डोमाळे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ओबीसी समाजाचे आरक्षण कायम ठेवून इतर कोणालाही त्यामध्ये समावेश होवू नये याकरीता तसेच ओबीसी समाजाचे शासन दफ्तरी असलेले विविध प्रश्न या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी वडीगोद्री येथे ओबीसी समाज बांधवांसाठी आमरण उपोषण केले प्रा.लक्ष्मण हाके सर आणि नवनाथ आबा वाघमारे हे ओबीसी समाजातील युवक, युवतींना तसेच सर्व महिला भगिनींना मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे या भव्य ओबीसी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मिनाक्षी देवकते डोमाळे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.