मनसेची सीएस बडेंकडे लेखी तक्रार
बीड । निवेदक
शहरातील प्रायवेट हॉस्पीटलमध्ये व स्वतंत्र पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासण्यासाठी मनमानी करुन अव्वाच्या-सव्वा टलमध्ये आमच्याकडेच तपासण्या करा नाहीतर बाहेरचे रिपोर्ट ग्राह्य धरले जाणार नाहीत अशा प्रकारे रुग्णाच्या मनाविरुद्ध तपासण्या करण्यास प्रवृत्त करायला लावतात यामुळे खासगी डॉक्टर आणि लॅब असोसिएशन यांना आपल्या स्तरावरुन कार्यवाही करा अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहराध्यक्ष करण लोंढे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष ऋषीकेश गिराम पाटील यांचय वतीने देण्यात आला आहे.
पुढे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यात सुरु असलेल्या प्रायव्हेट हॉस्पीटलमधील पॅथॉलॉजी लॅब चालक व तेथील डॉक्टरांशी संगनमत करुन पेशंटकडून मनमानी किंमतीमध्ये तपासण्या करुन नागरिकांची सर्रास लुट होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आलेल्या तक्रारीवरुन ही लुट थांबवण्यासाठी संबंधीत अधिकार्यांशी एक टीम तयार करुन सर्व पॅथॉलॉजी लॅबचा आढावा घेवून संबंधित लॅब चालक आवश्यक प्रमाणपत्र न घेता लॅब चालवत आहे का व त्या लॅबचालकाची लॅब चालवण्याची पात्रता व तिथे काम करणारे टेक्नीशियन यांचे शिक्षण पुर्ण आहे का? ह्या गोष्टी व तो लॅब चालक कट प्रॅक्टीस करुन नागरिकांची लुट तर करत नाही ना ? याची चौकशी करावी व सर्व नियमांचे पालन होत आहे का याचा आढावा घेण्यात यावा ही नम्र विनंती तसेच नियमबाह्य लॅबचालकावर कार्यवाही करुन त्यांची लॅब बंद करण्यात यावी अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.