विनयभंगसह मारहाण केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता-अ‍ॅड.शेख इम्रान खाजा

अ‍ॅड.शेख इम्रान खाजा यांचा युक्तीवाद

बीड । निवेदक
दि.16 मार्च 2018 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान शहेंशावली दर्गा बीड येथे फिर्यादीच्या राहत्या घरी आरोपींनी फिर्यादीस अपशब्द वापरुन व लाथा-बुक्क्याने मारहाण व शिवीगाळ करुन विनयभंग केल्याची तक्रार पेठ बीड पोलीस स्टेशन, बीड येथे फिर्यादीच्या वतीने देण्यात आली होती त्या फिर्यादीवरुन आरोपींविरोधात भा.दं.वि.चे कलम 354, 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा क्र.89/2018 नोंदविण्यात आला होता. सदरील आरोपींची मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बीड यांनी दि.09 जुलै 2024 रोजी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली या वेळी अ‍ॅड.शेख इम्रान खाजा यांनी यांनी आरोपीच्या वतीने काम पाहिले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीड शहरातील शहेंशावली दर्गा परिसरात राहणार्‍या फिर्यादीस याच परिसरातील आरोपींनी शिवीगाळ व मारहाण करुन विनयभंग केला अशी तक्रार पेठ बीड पोलीस स्टेशन येथे दि.16 मार्च 2024 रोजी देण्यात आली होती. त्यावरुन आरोपींविरोधात भा.दं.वि.चे कलम 354, 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा क्र.89/2018 नोंदविण्यात आला होता. सदरचे प्रकरण मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, बीड यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होवून सदरचे प्रकरण चालवण्यात आले. या प्रकरणात एकूण 04 साक्षीदार सरकारी पक्षाच्या वतीने तपासण्यात आले परंतू सबळ पुराव्या अभावी आरोपींना मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बीड यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. यावेळी आरोपी क्र.4 यांच्यामार्फत अ‍ॅड.शेख इम्रान खाजा यांनी न्यायालयीन कामकाम पाहिले त्यांना अ‍ॅड.पंकज रायभोळे, अ‍ॅड.शेख अन्वर, अ‍ॅड.सुर्यकांत पवार यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a comment