ना.धनंजय मुंडेंवर पक्षाकडून नवीन जबाबदारी

मुंबई । निवेदक
संघर्षशील राजकारणी म्हणून ख्यातकीर्त असणारे आणि राजकीय क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि राज्याचे कृषीमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पक्षाने आणखी एक जबाबदारी टाकली आहे. राज्यभरात एक आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या धनंजय मुंडेंवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख प्रवक्तेपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतची घोषणा पत्रकारपरिषदेच्या माध्यमातून केली आहे.
प्रभावी वक्तृत्वाने लोकांच्या मनात स्थान निर्माण करणारे धनंजय मुंडे हे राज्यातील सर्व राजकीय नेत्यांमधील एक प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळे अनेकदा स्टार प्रचारकांमध्ये त्यांचा समावेश राहिलेला आहे. आता जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचता यावे, सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवीत आणि विरोधकांचा समाचार घेता यावा यासाठी राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांच्यावर पक्षाचे प्रमुख प्रवक्ते म्हणून जबाबदारी टाकली आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे हे नव्या जबाबदारीत अधिक आक्रमकपणे समोर येताना दिसतील.

Leave a comment