बीड । निवेदक
आई-नाना प्रतिष्ठान बीड संचलित, माँसाहेबप्रेरणा ऑर्गनायझेशन बीड, महाराष्ट्र राज्याच्यावतीने बीड तालुक्यातील सुर्डी (थोट) येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून बुधवार दि.17 जुलै 2024 रोजी माँसाहेबप्रेरणा ऑर्गनायझेशनच्या संस्थापक अध्यक्षा अॅड.प्रेरणा सूर्यवंशी यांनी शेतकर्यांच्या बांधावर जावून फळांच्या व फुलांच्या विविध प्रकारच्या 40 रोपांचे वृक्षारोपण केले. या वृक्षारोपण कार्यक्रमास शेतकर्यांनी स्वकष्टाने उत्स्फुर्तपणे खड्डेखोदून श्रमदानाचे मोलाचे सहकार्य केले. तसेच महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला तसेच वृक्षसंगोपन करण्याची हमी अॅड.प्रेरणा सूर्यवंशी यांना दिली.
याप्रसंगी उपस्थित महिला व शेतकर्यांना ऑर्गनायझेशनच्या संस्थापक अध्यक्षा अॅड.प्रेरणा सूर्यवंशी यांनी झाडाचे आणि वृक्ष लागवडीचे महत्व अनेक वेगवेगळी उदाहरणे देवून सांगितले. वृक्ष लागवड चळवळ देशभरात विशाल व्हावी ही अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमास मौजे सुर्डी (थोट)चे ग्रा.पं.सदस्य दयानंद उबाळे यांनी अथक परिश्रम घेवून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठीत नागरीक डावकर नाना, रामहरी उबाळे, नवनाथ (नाना) डोईफोडे, भैय्यासाहेब उबाळे, उर्मिला उबाळे, विशाल डोंगरे, हरिभाऊ डोंगरे, बबन पठाण, महेश डोंगरे, दादाराव थोटे, शालन उबाळे, गणेश थोटे, बंडू उबाळे, मोरे यांच्यासह शेकडो शेतकरी, महिला, पुरुष, युवक, युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.