रुम पाहिजे, अमुक… अमुक इथेच राहतात ना म्हणुन होत आहे टेहाळणी
बीड । निवेदक
बीड शहरात हल्ली नवीन नगर परिषद हद्दीमध्ये चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले असून पोलीस यंत्रणेला अथवा नागरिकांना चोरं घाबरत नसल्याचे वाढत्या चोरीच्या रेशिओ मुळे दिसू लागले आहे. त्यामुळे नागरिकांनो सावधान राहा, काळजी घ्या आणि कोणालाही कसलीही परिसरातील माहिती देतांना शहानिशा करुन घ्या.
बीड शहरात म्हणजे जास्त करुन शिवाजी नगर पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. यातच जितके विज्ञान दिवसेंदिवस प्रगती करुन गुन्हेगारीला अथवा चोरी करण्याच्या मार्ग बंद करत आहे तितकेच नवनवीन शक्कल लढवून चोरांकडून देखील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. बीड शहरात हल्ली रुम पाहिजे, एखादे जास्त परिचित असणारे आडनाव जे आडनाव कॉमन असते असे नाव घेवून दिवसा टेहाळणी होत होतेय. त्यामुळे नागरिकांनी आता तुमची काळजी तुम्हीच घ्या आणि आपल्या परिसरातील माहिती देतांना सदरील व्यक्तीची खात्री करुनच त्याला कोण कुठे राहतो आणि रुम आहे का नाही? याची खात्री करा.
नागरिकांनी घाबरुन जावू नये काही अडचण आल्यास तात्काळ संपर्क करावा-पोलीस निरीक्षक खेडकर
वाढत्या चोर्यांवर अंकुश लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कुठलीही माहिती मिळाली तर तात्काळ पोलीसांशी 112 वर संपर्क साधावा. नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाईल परंतु कोणाला अडवून कायदा हातात घेवू नका तसेच संशयितांना देखील मारहाण करु नका असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री. खेडकर यांनी केले आहे.