शिक्षण विभागाकडून संघर्षयोद्धा शांतता रॅलीनिमित्त सर्व शाळांना आज सुट्टी
बीड । निवेदक
सकल मराठा समाजाच्या वतीने आज गुरुवार दि. 11 जुलै 2024 रोजी बीड शहरामध्ये मराठा आरक्षण योद्धा मा. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य स्वरूपात ’संघर्षयोद्धा शांतता रॅली’ चे आयोजन करण्यात आले आहे. ज्यासाठी संपुर्ण बीड शहर भगवेमय होवून छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणाने दुमदुमूल गेले आहे. या शांतता रॅली निमित्त अनिल दादा जगताप यांच्याकडून शिक्षणाधिकारी यांना पत्र देवून विनंती करण्यात आली होती की शाळकरी मुलांची गैरसोय होवू नये म्हणून सुट्टी द्यावी अनिलदादा यांच्या प्रयत्नांना यश आले असून आज सुट्टी देखील जाहीर झाली आहे.
आज होणार्या रॅलीमध्ये जिल्ह्याभरातून मराठा बांधव, महिला भगिनीं या मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे साहजिकच बीड शहरातील सर्व रस्ते सकाळी 10.00 वा ते सायंकाळी 06 वा. पर्यंत बंद राहतील अशी परिस्थिती आहे. रॅलीच्या दरम्यान होणार्या गर्दीमुळे शाळकरी मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून मराठा सेवक अनिल जगताप यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक /माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, बीड यांना शालेय विद्यार्थ्यांना एकदिवसयीय सुट्टी जाहीर करावी असा विनंती अर्ज केला होता. अनिल जगताप यांच्या विनंतीचा मान राखत शिक्षणाधिकारी प्राथमिक /माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, बीड यांनी आज दि. 11 जुलै 2024 रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. बीड शिक्षण विभागाच्या या सहकार्याबद्दल मराठा सेवक अनिल जगताप यांनी आभार मानले आहेत.