बीड । निवेदक
राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली. या योजनेचा शासन आदेशही निघालेला आहे. सुरुवातीला या योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 15 जुलै होती परंतु शासनाने यात दुरुस्ती केलेली आहे. आता ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि महा-ई सुविधा केंद्रांच्या संचालकांकडून लाभार्थीची मोठी आर्थिक लूट तसेच पिळवणूक होत आहे तरी यांच्यावर प्रशासनाने लक्ष ठेवून कार्यवाही करावी अन्यथा आम्ही धडा शिकवू असे पत्रकाद्वारे शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष शेख अझहर यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
पुढे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सरकारने सुरु केलेल्या’ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करण्यात आली आहे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचीतारीख 15 जुलै ऐवजी 31 ऑगस्ट 2024 करण्यात आली आहे. म्हणजे या योजनेला अर्ज दाखल करण्यासाठी 2 महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच योजनेतील 5 एकरची अट रद्द करण्यात आली आहे. महिलांची वयोमर्यादा 21 वर्ष ते 60 वय होती ती आता 65 वर्ष करण्यात आली आहे. ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्य असेल त्यांना उत्पन्नाच्या प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे असे शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. योजनेतील जाचक अटी रद्द करण्यात आलेल्या आहेत. या योजनेच्या पात्रतेत अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापुर्वीचे रेशन कार्ड / मतदार ओळखापत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्म दाखला या चारपैकी कोणते ही एक ओळखपत्र / प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा
लाभ देण्यात येणार आहे सेतू केंद्रावाल्यानी एक अर्ज दाखल करतांना किती पैसे घ्यावेत असा नियम शासनाने ठरवून दिलेला आहे, परंतु तरीही नियम डावलून जास्तीचे पैसे जास्ती घेणारे विरुद्ध कारवाई करण्यात यावी तसेच राजकीय पक्षांनी फुकट ऑनलाईन
फॉर्म भरून द्यावेत शिवसंग्राम जिल्हा उपाध्यक्ष शेख अझहर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ भेटावा म्हणून माता-भगिनी सध्या महा-ई सेवा केंद्रावर गर्दी करत आहेत परंतू महा-ई सेवा केंद्र चालकाकडून मनमानी करुन जादा रक्कमेने पैसे घेतले जात आहेत त्यामुळे माता-भगिंनींची मोठी आर्थिक लूट केली जात आहे. शासनाने आता मुदत वाढविली असल्यामुळे लाभार्थी महिलांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. कुठलेही जादा पैसे न देता वेळेत अर्ज दाखल करावा, जर कोणी जास्तीचे पैसे घेऊन आर्थिक लूट करत असेल तर त्या विरुद्ध शासनाला तक्रार करावी अन्यथा शिवसंग्रामशी संपर्क करावा त्यांना तात्काळ मदत आम्ही करु असे देखील शेख अझहर यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.