सोशल मीडियावर आक्षेपार्ट पोस्ट टाकणाराला माफी नाही- पोलीस अधिक्षकांचा इशारा

फेसबुकवर पोस्ट करणारावर कंमेट करणारावर तसेच व्हाट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये मॅसेज टाकल्यावर अ‍ॅडमिनवर देखील गुन्हा दाखल होणार

बीड । निवेदक
सोशल मीडियाचा वापर करताना कुठलेही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास अथवा पोस्टला आक्षेपार्ह कमेंट केल्यास गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करू असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे.
पत्रकार परिषद बोलताना ते म्हणाले की, गेल्या काही दिवसात बीड जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण होईल किंवा सामाजिक सलोखा बिघडेल अशा पोस्ट होत आहेत.गेल्या 15 दिवसात एकूण 28 गुन्हे याप्रकारे नोंदविले गेलेले असून 600 जणांच्या पोस्ट तपासण्यात आलेल्या आहेत, तसेच 550 पोस्ट त्यापैकी डिलीट करायला लावलेले आहेत, त्यामुळे कुठलाही वाद होईल अशा पोस्ट करू नका, तसेच व्हाट्सअप ग्रुप वर कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट आल्यास पोस्ट करणारा वर आणि एडमिन वर देखील कारवाई करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आणि कुठेही आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्यास सायबर विभाग अथवा पोलीस अधीक्षक यांच्याशी तात्काळ संपर्क करण्याच्या आव्हान त्यांनी केलेले आहे.

Leave a comment