सिताई कंन्स्ट्रक्शन ब्लॅकलिस्ट करा

बीड (प्रतिनिधी)- बीड शहरातील प्रभाग क्र.24 मध्ये सन 2023-24 काळात प्रभागामध्ये अनेक कामे मंजूर झाले होते. सदरील कामे ही सिताई कंन्स्ट्रक्शनला मिळाले होते परंतू सदरील कामे ही अंदाजपत्रकानुसार केलेले नसून निकृष्ट व बोगस दर्जाचे व अर्धवट/अपुर्ण अवस्थेत सोडलेले आहेत ही बाब अतिशय गंभीर आहे यामुळे स्थानिक विभागातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे व नाहक त्रास सहन करावा लागत आहे याबाबत प्रभागातील माजी नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून सिताई कंन्स्ट्रक्शनवर कायदेशीर कार्यवाही करुन त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.तसेच सदरील एजन्सीवर कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांसमवेत आंदोलन करणार असल्याचे नगरसेवकांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.