दुष्काळी भागाचा कायापालट करू, अवजारांवर शुन्य टक्के कर करू-जयंत पाटील

तुमच्याकडे 26 साखर कारखाने होते त्याचे काय झाले? -बजरंग सोनवणे

आष्टी । निवेदक
आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलावात पाणी पाडू, तसेच जिल्ह्यातील दुष्काळी भागाचे चित्र बदलण्यासाठी घाट माथ्यवरचे वाहून जाणारे पाणी आणण्याचा प्रयत्न करू,आमचे सरकार आल्यावर शेतकर्‍यांच्या अवजारांवर शून्य टक्के कर करणार, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आष्टी येथील प्रचारसभेत केले तर बजरंग सोनवणे यांची आपल्या भाषणादरम्यान म्हटले की तुमच्याकडे 26 साखर कारखाने होते त्याचे काय झाले? असा सवाल आपल्या भाषणादरम्यान उपस्थित केला.
बीड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या जाहीर प्रचार सभेत आष्टी येथे ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा.डॉ.अमोल कोल्हे, आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.साहेबराव दरेकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राम खाडे, पूजा मोरे, उपस्थित होते.यावेळी जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. पुढे बोलताना ते म्हणाले,केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकर्‍याला खड्ड्यात घालण्याचे काम सरकारने केले. आमचे सरकार आल्यावर शेतकर्‍यांच्या अवजारांवर शून्य टक्के कर करणार असल्याचे आपल्या घोषणा पत्रात सांगितले. यावेळी राज्यात 48 खासदारांपैकी 32 ते 35 खासदार महाविकास आघाडीचे होणार असून त्यापैकी 8 खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद पवार पक्षाचे असणार आहेत, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. उमेदवार बजरंग सोनवणे म्हणाले, विद्यमान खासदारांनी जनतेला दहा वर्षाच्या कामाचा हिशोब द्यावा. दहा वर्षांमध्ये शेतकर्‍याचे कोणतेही प्रश्न सोडवले नाही. मला शेतकरी पुत्र म्हणून हिणवत आहेत मात्र याच शेतकरी पुत्राने बीड जिल्ह्यात दोन सहकारी साखर कारखाने सुरळीतपणे चालविले असून दर पंधरा दिवसाला शेतकर्‍यांना उसाचे पैसे दिले तर कर्मचार्‍यांचे पगारही रेग्युलर दिलेले आहेत. पंकजा मुंडे यांच्यावर टीका करताना त्यांनी सांगितले की तुमच्याकडे 26 साखर कारखाने होते त्याचे काय झाले? याचे उत्तर तुम्ही का देत नाहीत.तसेच मी जिल्हा परिषदमध्ये असताना काहीच काम केले नाही असे सांगत आहात तर पंकजाताई तुम्ही ज्या गावांमध्ये येत्या लोकसभेचे मतदान करणार आहेत, त्या नाथरागावातील या गावातील दवाखाना सुद्धा मी दिला आहे, हे विसरू नका. शेतकरी पुत्राने उद्योजक होऊ नये का? माझ्यावर शेतकरी पुत्र नसल्याचा आरोप करीत आहात मग तुम्ही ऊसतोड कामगार म्हणून स्वत:ला कसे घेता. तुम्ही कधी ऊस तोडला याचे उत्तरही द्यावे. शेतमालाला सध्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे भाव मिळत नाही. कांदा दूध कापूस सोयाबीन इत्यादीचा दर कुठे गेला आहे .त्यासाठी संसदेत तुम्ही काय केले याचा हिशोब जनतेला देण्याचे आवाहन बजरंग सोनवणे यांनी केले. यावेळी माजी आमदार संदीप क्षीरसागर, साहेबराव दरेकर, राम खाडे महेबूब शेख, यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली

Leave a comment