
शके 1979 दि. 20 मे 1875. याची ठळक नोंद केज येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या दर्शनी भागाच्या डाव्या बाजूस एका दगडावर कोरीव अक्षरात आहे. मठाचे बांधकाम पुढे दहा वर्ष चालू होते. मठ पूर्ण झाल्याची तारीख 05 फेब्रुवारी इ.स. 1886 शुक्रवार अर्थात माघ शु. द्वितीय पार्थीव नाम संवस्तरे शकेे 1807. या मठाचे बांधकाम पुर्ण चिरेबंदी असुन राजवाडया समान आकाराचे आहे. मुख्य मंदिराच्या बाजुने 25 फुटाची तटबंद असुन मुख्य प्रवेशद्वार उत्तरामभिुख आहे. या मठाच्या मुख्य गाभार्यात काळया स्फटिकाच्या सिंहासनावर पादुकाची स्थापना केली आहे. त्यावर सिसमच्या लाकडाची नक्षीदार मेघडंबरी आहे.
श्री स्वामींनी दिलेल्या प्रासादिक वस्तू ठेवल्याचे दिसून जाते. 1) चरण पादुका, 2) पंच धातूची श्री पांडुरंग रुपातील मुर्ती, 3) दगडी गोटा 4) लाकडी दंड, 5) चर्म पादुका 6) स्वामींनी स्वत: वापरलेलया चंदन काष्ट पादुका (आत्मलिंग) या ठिकाणी पुजेत आहेत. मठाचे बांधकाम हेमाडपंती असुन वास्तु शिल्पाचा नमुनाच आहे. अनेक साधुसंतांची मांदियाळी येथे येऊन दर्शनाचा लाभ घेऊन जातात अशी परंपरा आहे. 145 वर्षापासून आज तागायत नानासाहेबांच्या परिवारातील वंशजाकडून येथील सेवा चालु आहे.मठात परिसरातील लोक खालील उत्सव साजरे करतात.
1) प्रगट दिन उत्सव, 2) श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी 3) श्री दत्त जयंती, 4) गुरु पौर्णिमा 5) श्री नानासाहेबांचे मुळ पुरुष रंगोपंत अण्णा यांची पुण्यतिथी, 6) श्री नानासाहेब महाराज यांची पुण्यतिथी
अशा हया पवित्र पावन मठामध्ये दर्शनाथी येतात आणि आनंद भरे तृप्त होतात ही ख्याती लोक वार्ता आहे. केज मधील हया मठाची देखभाल देशपांडे परिवार करत असून मठ खाजगीतला आहे.