समनक जनता पार्टी लोकसभेचा पाठिंबा देण्याबाबत आपली भूमिका तीन दिवसात जाहीर करणार

बीड । निवेदक
भटक्या विमुक्त आणि उपेक्षित समाजासाठी कार्यरत असणार्यांना एकत्र आणत आम्ही समनक पार्टीची स्थापना केलीय. समनक जनता पार्टी या पक्षाचा उद्देश आरक्षण आणि गोर-गरीब समाजाला संरक्षण असा असून आम्ही त्या करीता निवडणुक लढवत आहेत परंतू बीड मध्ये रविकांत राठोड यांना उमेदवारी दिली असता त्यांनी कुठलीही कल्पना पक्षाला न देता तसेच मी अपक्ष उभा होतो असे माध्यमांशी खोटे बोलून आमचा आणि नागरिकांचा विश्वासघात केला आहे त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही होईल त्यांना ज्या कोणत्या पक्षाने हे करायला लावले त्यांच्यावर देखील आम्ही कार्यवाही करु आणि 3 ते 4 दिवसांत समनक जनता पार्टी आता बीडमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा याची भूमिका जाहीर करेल असे समनक जनता पार्टीचे अध्यक्ष संपत चव्हाण यांनी आज (दि.01 मे 2024) रोजी बीड येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना माध्यमांना ही माहिती दिली. यावेळी पत्रकार परिषदेला राष्ट्रीय अध्यक्ष संपत चव्हाण यांच्यासह, यवतमाळ-वाशीम मतदारसंघाचे उमेदवार प्रा.डॉ.अनिल राठोड, विभागीय अध्यक्ष भगतसिंग राठोड, संजय पवार. सुभाष राठोड वडवणी. अप्पासाहेब राठोड, दिलीप जाधव, डि.एम.राठोड, रमेश चव्हाण, अरविंद चव्हाण, संजय राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, आम्ही यावेळी 7 जागा लढवत होतो/आहेत यामध्ये हिंगोली, नांदेड, धाराशिव, यवतमाळ- वाशिम, जालना आणि बीड अशा जागा असून आम्ही संपुर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवत आहोत आम्हाला यवतमाळ-वाशीम येथे वंचित बहुजन आघाडीने देखील पाठिंबा दिला आहे आम्ही संविधान वाचवण्याकरिता आणि देशातील महागाई, शिक्षण, खाजगीकरण याला विरोध करण्याकरिता निवडणुक लढवत आहोत. तसेच नेहमीच पक्ष बदल करत असलेले रविकांत राठोड यांना आम्ही बीड येथे त्यांच्यावर विश्वास ठेवून उमेदवार दिली परंतू त्यांनी आमचा विश्वासघात केला आणि माध्यमांना देखील खोटी माहिती दिली की मी अपक्ष उभा होतो परंतू वास्तविकतः तसे नसता ते समनत जनता पार्टीकडून उभे राहिले होते त्यासाठी उपस्थित पत्रकारांना त्यांनी पुरावे म्हणून निवडणुक निर्णय अधिकारी यांचे स्वाक्षर्या असलेले कागदपत्र दिले. तसेच रविकांत राठोड यांच्यावर कार्यवाही करु आणि त्यांना ऐन निवडणुकीच्या वेळी आमच्यापासून ज्या पक्षाने केले त्या पक्षावर देखील आम्ही कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे यामुळे समनक जनता पार्टी पाठिंबा कोणाला देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.