स्व.गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न माझ्या डोळ्यात आहेत मला एक संधी द्या-पंकजा मुंडे

बीड । निवेदक
आज झालेल्या जाहीर सभेत व्यासपीठावरुन आपल्या भाषणात भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे म्हणाल्या की, स्व.गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न माझ्या डोळ्यात आहेत मला एक संधी द्या मला काही पैसे कमवायचे नाहीत, नावाची, प्रसिद्धीची लालसा नाही. गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न माझ्या डोळ्यात आहेत. ते पूर्ण करण्याची अशी संधी पुन्हा येणार नाही. मला माझ्यासाठी नाही, तर जनतेसाठी पद हवे आहे.10 वर्षांपूर्वी 4 तारखेला मला गोपीनाथ मुंडेंना हार घालायचा होता, अंत्यसंस्कार करावा लागला. ती सल दूर करण्यासाठी ही शेवटची संधी मला द्या असे भावनिक आवाहन पंकजा मुंडेंनी केले. बीड लोकसभा निवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, उमेदवार पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे यांच्यासह आ. सुरेश धस, आ. नमिता मुंदडा, आ. लक्ष्मण पवार, आ. प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, अमरसिंह पंडित, भीमराव धोंडे, आर. टी . देशमुख, केशव आंधळे, आदिनाथ नवले, कल्याण आखाडे, रमेश आडसकर ,नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, अनिल जगताप, सचिन मुळूक, कुंडलिक खांडे , बाळासाहेब दोरतले , सुमंत धस, पी टी चव्हाण ,सलीम जहांगीर, विजयसिंह पंडित आदींची मंचावर उपस्थिती होती.
पंकजा मुंडेंनी पुढे बोलतांना म्हणाल्या की, आपल्या विकासावर कोणतेही काळेढग येऊ देऊ नका. मी यापुर्वी पराभव पचवलाय. हा पराभव माझा नव्हता तर जनतेचा होता. त्यामुळे माझी प्रत्येकावर बारीक नजर आहे. आता मी पदर पसरून म्हणतेय, एक काटा माझ्या मनात रुतलेला आहे तो म्हणजे 10 वर्षांपूर्वी 4 तारखेला मला गोपीनाथ मुंडेंना हार घालायचा होता, अंत्यसंस्कार करावा लागला. ती सल दूर करण्यासाठी ही शेवटची संधी मला द्या गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न माझ्या डोळ्यात आहेत. ते पूर्ण करण्याची अशी संधी पुन्हा येणार नाही. मला माझ्यासाठी नाही, तर जनतेसाठी पद हवे आहे.असे सांगितले.
खा. डॉ. प्रीतम मुंडे , आ. सुरेश धस , आ. बाळासाहेब आजबे,रमेश आडसकर, आ. प्रकाश सोळंके ,कल्याण आखाडे , अनिल जगताप ,सुमंत धस, सलीम जहांगीर, बाळासाहेब दोरतले , पी टी चव्हाण यांच्यासह इतरांची भाषणे झाली. प्रास्ताविक राजेंद्र मस्के यांनी केले. सभेला जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
पालकमंत्री धनंजय मुंडेंची बजरंग सोनवणेंवर टिका

जिल्ह्यातील जनतेने अनेकांना यापुर्वी जात-पात न पाहता संसदेत पाठविले आहे. घरातला पालक म्हणून मी या निवडणुकीकडे पाहत आहे. आज जातीपातीचे राजकारण केले जात आहे, पण या जिल्ह्यात स्व.गोपीनाथ मुंडेंनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही. समोरचे मात्र खालच्या पातळीवर जाऊन जात, पात , धर्मावर जातायत , त्याला थारा देऊ नका असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. विरोधी उमेदवार बहुरंगी आहे, बिगरशेतीचा शेतकरीपुत्र आहे .आम्ही कधी जातपात पाहिली नाही. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही सरकार म्हणून ठामपणे उभे राहिलो , कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला, समोरचा उमेदवार आरक्षण आंदोलनात कुठे होता? कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी मात्र हे सर्वात पुढे, हे काय समाजाचे भले करणार ? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला.

पंकजा मुंडेंसाठी मोदी घेणार सभा?
बीड लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचाराला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याची व 6 मे रोजी सभा होणार असल्याची माहिती सूत्रांची आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या राष्ट्रीय सचीव पंकजा मुंडे यांनी आज उमेदवारी दाखल केली आहे. जर पंतप्रधान मोदींची सभा बीडमध्ये झाली तर पंकजांना शंभर हत्तीचे बळ मिळेल असे आजच्या सभेवरुन चित्र स्पष्ट होत आहे.

रखरखत्या उन्हात हजारोंच्या संख्येमध्ये पंकजाताईंनी भरला उमेदवारी अर्ज
बीड -आज दि.24 एप्रिल 2024 रोजी पंकजा मुंडे यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ताईंच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भव्य रॅली काढण्यात आली ती रॅली अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत येवून तिथे अभिवादन व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ तेथे अभिवादन करुन पंकजाताईंनी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, खा.डॉ.प्रितम मुंडे, आ.सुरेश धस, आ.प्रकाश सोळंके, आ.बाळासाहेब आजबे, आ.लक्ष्मण पवार, आ.नमिता मुंदडा, आ.संजय दौंड, प्रकाश महाजन,अ‍ॅड.सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे,रमेश आडसकर, मोहन क्षीरसागर, अमरसिंह पंडित, राजेंद्र मस्के, राजेश्वर चव्हाण, शिवसेनेचे अनिल जगताप, सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरला.

Leave a comment