डॉ.ज्योती मेटे यांनी निवडणुकीतून माघार
सोमवारी शक्तीप्रदर्शन न करता नामनिर्देशन अर्ज दाखल करणार -बजरंग बप्पा सोनवणे
बीड । निवेदक
सध्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत डॉ.ज्योतीताई मेटे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेवून स्पष्ट केले की मी मतांचे विभाजन होवू नये म्हणून निवडणुक लढवणार नाही डॉ.ज्योती मेटे यांंची माघार म्हणजे मराठा समाजाचे दोन उमेदवार एकाच मतदारसंघातून उभे राहिले असते तर मतांचे विभाजन झाले असते परंतू डॉ.ज्योती मेटे यांनी निवडणुकीतून माघार घेणे हा बजरंग सोनवणे यांच्यासाठी प्लस पाँइट असल्याची चर्चा बीडकरांत पहायला मिळाली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे बजरंग बप्पा सोनवणे यांनी देखील दुपारी पत्रकार परिषदेत डॉ.ज्योती मेटे यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे तसेच शनिवारच्या दिवशीच बजरंग बप्पा यांना ज्योती मेटे यांची निवडणुकीच्या मैदानातून माघार घेणे म्हणजे त्यांना बजरंगी वार्ता (बजरंगी शब्दाचा अर्थ- वज्रासारखे बळ असणारी) ऐकावयास मिळाल्याने डॉ.ज्योती मेटे यांच्या माघारीचा फायदा बजरंग सोनवणे यांना होणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे. तसेच बजरंग सोनवणे यांची गतवेळी 5 लाखापेक्षा जास्त मतदान मिळवले होते परंतू त्यावेळी त्यांच्या बाजूने मोठे मोठे नेते होते, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते होते यावेळी मात्र त्यांच्याकडे आ.संदीप क्षीरसागर काँग्रेसचे रजनीताई पाटील, अशोकराव देशमुख, राजेसाहेब देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते, रत्नाकर शिंदे यांचे सहकार्य होणार आहे त्यामुळे गतवेळी 5 लाखापेक्षा जास्त मत घेणारे बजरंग बप्पा यावेळीही काय चमत्कार घडवतात याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
शनिवारी दुपारी बजरंग सोनवणे यांनी देखील पत्रकार परिषद घेवून येत्या 22 एप्रिल 2024 रोजी कुठल्याही प्रकारचे शक्तीप्रदर्शन न करता आ.संदीप क्षीरसागर, काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख, माजी आ.उषाताई दराडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सातपुते, गणेश वरेकर, रत्नाकर शिंदे, आम आदमी बीडचे पदाधिकारी, आणि इंडिया आघाडचीे सर्व पदाधिकारी सोबत घेवून नामनिर्देशन अर्ज दाखल करणार असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस भवन बार्शी रोड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, गेल्या 10 वर्षात खासदारांकडून बीड जिल्ह्यासाठी काहीही विकास झाला नसून पाण्याचा, रेल्वेचे आणि शेतकर्यांचे प्रश्न कायम आहेत. रेल्वेच काम या गतीनेच राहिले तर रेल्वे येण्यासाठी 25 वर्ष लागतील. तसेच गेल्या 10 वर्षात बीड जिल्ह्याच्या खासदार ग्रामीण भागात कोठेही साधं भेटीसाठी देखील गेल्या नाहीत गेल्या 10 वर्षात बीड जिल्ह्याचा विकास झालेला नाही.