गेवराईमध्ये श्रीराम मंदिर संस्थाकडून बुधवारी होणार रामनवमीचा भव्य-दिव्य कार्यक्रम

बुधवारी संत भक्तगणांच्या सायंकाळी भव्य पालखी मिरवणूक तर गुरुवारी महाप्रसाद

गेवराई । निवेदक
दि.17 एप्रिल 2024 रोजी बुधवारी प्रति वर्षाप्रमाणे गेवराई येथील श्रीराम मंदिर संस्थान मध्ये प्रभू रामचंद्र यांचा जन्मोत्सव मोठ्या थाटा-माटात होणार असून श्रीराम नवमी निमित्त श्रीराम मंदिर संस्थाकडून दरवर्षीप्रमाणे संगीतमय श्रीराम कथा सोहळ्याचे आयोजन केले जाते यावेळेस हा सोहळा दि.12 एप्रिल रोजीपासून सुरुवात झालेली असून आज दि.17 एप्रिल 2024 रामनवमीचा कार्यक्रम तर दि.18 एप्रिल 2024 गुरुवार रोजी या सोहळ्याची सांगता होणार आहे या कार्यक्रमास ह.भ.प. अनंत महाराज जोशी यांचे श्रीराम कथा संपन्न होणार आहे तरी श्रीरामभक्तांनी रामनवमीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
पुढे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आज दि.17 एप्रिल रोजी श्रीराम जन्म सोहळ्याचा कार्यक्रम आणि सायंकाळी भव्य पालखी मिरवणूक होणार आहे व गुरुवारी दि.18 एप्रिल रोजी श्रीराम कथा सोहळयाची सांगता आणि दुपारी महाप्रसाद कार्यक्रम होईल असे संस्थानच्या वतीने कळवण्यात आले आहे.
तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डॉ.हेमंत वैद्य, अ‍ॅड. राजेंद्र राक्षसभुवनकर, गणेश रामदासी, प्रशांत वाघमारे, आनंद रामदासी, कमलाकर पाठक, सचिन मुळे, सचिन रामदासी, श्रीपाद रामदासी, दयाघन रामदासी, अनिल बोर्डे, मिलींद वाघमारे, अशोक देऊळगांवकर, मोहन राजहंस, बंडु रामदासी, अनिल रामदासी, गोरख शिंदे, अमृत गोले, वाघमारे बंधू, हिटनाळीकर, दायमा, बाहेती, विश्वास चपळगावकर, रविंद्र रामदासी, आनंद रामदासी, विनायक रामदासी, प्रमोद रामदासी, धोंडलकर व समस्त रामभक्त यांच्याकडून करण्यात आले आहे.

Leave a comment