बीडकरांसोबत दरवेळेस आवळा देवून कोहळा काढण्याचा प्रकार!
बीड । निवेदक
गेल्या 15 वर्षांपासून लोकसभा ही भाजपाच्या ताब्यात आहे विशेष म्हणजे त्यांची 2014 आणि 2019 साली केंद्रात सरकार देखील सत्तेवर आले आणि भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते असलेले स्व. प्रमोद महाजन आणि स्व.गोपीनाथ मुंडे यांचे हे होम ग्राऊंड आहे परंतू दुर्देवाने ते आज दोघेही नाहीत पुढे मुंडे यांचेच वारस यांनी ओळख चांगली सांभाळून ठेवली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना भावनिक आवाहन करतांना म्हणाले होते की, मी या राज्याशी जोडला गेलेला होतो गोपीनाथ मुंडे असते तर माझी महाराष्ट्रात प्रचारासाठी येण्याची गरज नव्हती आणि बीडला रेल्वे आणणे ही माझी जबाबदारी आहे परंतू बीडला रेल्वे न आल्याने आणि स्व.गोपीनाथ मुंडे असते तर रेल्वेचा जिव्हाळ्याचा प्रश्न मागेचा निकाली लागला असता यामुळे हा मुद्दाच महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे दरवेळेस बीडकरांसोबत आवळा देवून कोहळा काढण्याचा प्रकार होतो त्यामुळे बीडकरांचा चांगलाच भ्रमनिरास झाल्याचे पहावयास मिळते तरी रेल्वे कधी येणार ? या प्रश्नाचे उत्तर केंद्रात सत्तेवर आलेले सरकारच देवू शकते मात्र रेल्वेमुळेच भाजपा असो अथवा इतर कोणताही पक्ष यामुळेच बीड लोकसभा जिंकतो आणि रेल्वेचे काम कासवगतीने चालू राहते त्यामुळे जनतेचे स्वप्नाचा चुराडा होतो मात्र रेल्वे येत नाही हेच चित्र आजपर्यंत तरी पहायला मिळाले त्यामुळे पुढे असे व्हायला नको अशी चर्चा जनतेत होत आहे.मुंडे परिवाराचा बालेकिल्ला राहिलेला बीड जिल्हा हा पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी मिळाल्याने सध्या राज्यभर चर्चेत आहे. विशेष म्हणजे यावेळी डॉ.प्रितम मुंडे यांच्या ऐवजी पंकजाताई मुंडे यांना तिकीट मिळाल्याने या निवडणुकीला आता विशेष महत्त्व आले आहे.
संघर्षकन्या म्हणून पंकजाताई मुंडे यांची ओळख आहे गेल्या 05 वर्षांत तर त्यांना अनेक वेगवेगळ्या संकटाचा सामना करावा लागला मात्र, आता भारतीय जनता पार्टीने लोकसभेची उमेदवारी दिल्याने राजकीय आखाड्यामध्येही आता पंकजाताईंची चर्चा जास्त आहे. सध्या राज्याच्या राजकारणातही उलथापालथ घडत असून, मरगळ आलेल्या आणि निराश झालेल्या सर्व राजकीय पक्षांमध्येही निवडणुकीमुळे काही महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत.
पंकजाताईंची उमेदवारी जाहीर होण्याआधी जिल्ह्यामध्ये प्रितमताई मुंडे यांच्या कामाबद्दल कभी खुशी कभी गम असे चित्र दिसत होते. बीडमधील वातावरण डॉ.प्रितम मुंडे यांना अनुकूल नसल्याचे पक्षश्रेष्ठींना वाटत असल्याने पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी दिली गेली मात्र पंकजाताई यांना उमेदवारी जाहीर होताच प्रमुख विरोधी पक्ष असणारा शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि पंकजाताई यांच्या विरोधकांचा सूर बदलला आणि आता बीडमध्ये अटीतटीचा सामना होणार असल्याचे चित्र तयार झाले आहे.
कारण की, बजरंग सोनवणे यांची गतवेळी 5,09,807 इतके मतदान मिळविले होते आता यावेळी ते तितकेच मतदान मिळवितील का ? याकडे पाहणे गरजेचे आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीने गेल्या 2019 च्या निवडणुकीत 92139 मतदान मिळविले होते आता यावेळी त्यांनी देखील प्रचारात आक्रमक होत उडी घेतल्याने व बीड मतदार संघात दलित बांधव आणि अॅड.प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने ते देखील किती मतदान घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बीडमध्ये जेंव्हा खासदार कोणत्या पक्षाचा लागतो तेंव्हा त्याच पक्षाची सत्ता देशात येते असा इतिहास 2009 सालापर्यंत घडला होता मात्र हा रेकॉर्ड स्व.गोपीनाथ मुंडेंच्या वेळी मोडला होता 2009 साली स्व.गोपीनाथ मुंडे यांनी निवडणुक जिंकली परंतू देशात मात्र युपीए सरकार सत्तेवर आले होते त्यामुळे बीडमध्ये कोण खासदार होईल आणि त्यावरून देशाच्या राजकारणावर खरेच काही मोठा परिणाम होईल का, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो.
भाजपाने आपली सगळी शक्ती पणाला लावून या ठिकाणी गत वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार पराभूत केला होता.
भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते असलेले स्व. प्रमोद महाजन आणि स्व.गोपीनाथ मुंडे यांचे हे होम ग्राऊंड आहे परंतू दुर्देवाने ते आज दोघेही नाहीत पुढे मुंडे यांचेच वारस यांनी ओळख चांगली सांभाळून ठेवली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना भावनिक आवाहन करतांना म्हणाले होते की, मी या राज्याशी जोडला गेलेला होतो गोपीनाथ मुंडे असते तर माझी महाराष्ट्रात प्रचारासाठी येण्याची गरज नव्हती आणि बीडला रेल्वे आणणे ही माझी जबाबदारी आहे परंतू बीडला रेल्वे न आल्याने आणि स्व.गोपीनाथ मुंडे असते तर रेल्वेचा जिव्हाळ्याचा प्रश्न मागेचा निकाली लागला असता त्यामुळे हा मुद्दा देखील या निवडणुकीत हुकूमी इक्का ठरणार आहे.पंकजाताई मुंडे निवडणुकीच्या राजकारणात तशा जुन्या आहेत. दोन वेळा विधानसभा निवडणुक आणि कॅबिनेट मंत्रीपद तसेच अनेक वर्षांपासून त्या राज्याच्या आणि काही निवडणुका देशाच्या राजकारणात असल्याने त्यांनी वेगळीच छाप पाडली आहे मात्र, ही निवडणूक जिंकण्यासाठी तेवढे प्रयत्न पुरेसे ठरणार नाही असे दुसर्या बाजूला बजरंग सोनवणे यांना देखील गत निवडणुकीचा अनुभव आणि त्यांनी काही दिवसापुर्वी मराठा आरक्षणाच्या बाजुने घेतलेली भूमिका तसेच राज्यात मोठे राजकीय वजन असलेल्या शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे आणि या निवडणुकीत रेल्वे हाच प्रमुख मुद्दा असणार ही हाक मात्र जनतेतून ऐकावयास मिळत आहे.