अग्रलेख
कॉप्या देण्यासाठी एक व्यक्ती पोलिस कर्मचारी म्हणून परीक्षा सेंटरवर जातो आणि तिथं तो सॅल्यूट मारताना संशयीत म्हनुन पकडला जातो त्यापुढे लक्षात आले की तो पोलीस कर्मचारी नव्हताच तो होता तोतया पोलीस यानंतर गुन्हेगारांची दुसरी हिंमत म्हणजे तर नुकतीच वर्तमानपत्रात बातमी छापून आली की पोलीसांच्या डोळ्यात चटणी टाकणार्याला ठोकल्या बेड्या या महाशयाला न कसली भिती ना काही याने चक्क पोलीस कर्मचार्याच्या डोळ्यातच चटणी टाकून पळ काढला होता तिसरी हिंमत तर ऐकून धक्काच बसेल ती घटना म्हणजे बीड येथे परिवहन अधिकार्याचा गणवेश घालून परिवहन अधिकार्याच्या कार्यालयात जाऊन तेथील कर्मचार्यांना आदेश देणे कामाबद्दल सांगणे या याप्रकारे परिवहन अधिकार्याची बतावणी करणार्या तो तयार पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे, त्याने बीड येथील परिवहन कार्यालयात येऊन आपण अंबाजोगाई येथे परिवहन अधिकारी असल्याची माहिती येतो त्याने कार्यालयात वरिष्ठ अधिका-यापासून कनिष्ठ कर्मचार्यापर्यंत सर्वांना दिली आणि चक्क तो कर्मचार्यांना काही आदेश देऊ लागला या कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्यांना काही संशय आला आणि त्यांनी अंबाजोगाई येथील कार्यालयात चौकशी केली असता अशा त-हेने बतावणी करीत कोणीतरी अज्ञात इसम फिरतो असं तेथील कर्मचार्यांनी सांगितलं त्यानंतर पोलिसांना बोलावून या तोतयास ताब्यात दिले. संशय आलेल्या वरिष्ठ अधिकार्याचं कौतुक करावं का गणवेश घालून परिवहन अधिकार्याची उत्तम बतावणी करणार्या या तोतयाचे अभिनयाचे हिमतीचे धाडसाचे कौतुक करावे असं प्रश्न पडतो आहे. मुळात कायद्याचा धाकच राहिला नाही. कायदा कशाला म्हणतात हे बीडमध्ये शोधून मिळाले तर जनतेने शोधून पहावे बीडचे पोलीस यांनी गुन्हेगारांना मोकाट सोडण्याचा विडाच उचललाय की काय ? अशी शंका येते ! जिथे खरोखर अन्याय घडला आहे त्या ठिकाणी गुन्हे दाखल करायला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातो कायदा फक्त सर्वसामान्य माणसांसाठीच लागू आहे का असे सध्याच्या पोलिस अधिकारी-कर्मचार्यांच्या कामगिरीतून आणि वागणुकीतून दिसून येत आहे. कायद्याची कोणाला भीती वाटत नाही. आधी पोलीस तपास पुढे वकीलांकडून लागणारा वेळ, त्यात सुट्टीचे वार यात भरपूर कालावधी जातो, त्यामुळे आपल्याला कसलीही चिंता करायचे कारण नाही, अशी भावना गुन्हेगारांमध्ये निर्माण झालेली आहे. ही अत्यंत धोक्याची गोष्ट आहे. फक्त चोरी, दरोडे, अत्याचार याबाबत कडक कायदे होण्याची गरज असून इथे अत्यंत जलद गतीने निकाल दिला गेला पाहिजे. आरोपींना पीडितांनी ओळखलेले असते, कबुली झालेली असते, माननीय कोर्टाने शिक्षा देखील दिलेले असते सगळे झाल्यावर आरोपी शिक्षा भोगून येतात आणि पुन्हा गुन्हा करण्याचे प्रताप करतात हे धाडस येते कोठून हे न उलगडणारे कोडे आहे. अशात तर मोबाईलमुळे वाट्टेल तसे स्टेटस ठेवणे, वाटेल ते कमेंट करणे आणि वाटेल ते चॅटिंग करणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत आणि यातूनच जातीय व सामाजिक सलोखा बिघडत चालला आहे. सामाजिक वातावरण दूषित होत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत आहे. याचं किंचितही भान राहिले नाही. असे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. काही ठिकाणी कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांच्या टोळक्यांच्या दोन गटात भरचौकात हातात हाणामारी, मुलींची छेडछाड असे प्रकारही सर्रास होत असतात. राजकीय पुढारी आपल्या पाठीशी असल्याच्या भ्रमात राहून सध्या ही तरुणाई दिशाहीन व भरकटत चालली आहे. गाव पुढारी आणि काही संघटनांच्या नादी लागून ही तरुणाई आपले शैक्षणिक आयुष्य बरबाद करीत आहेत आणि आई-वडिलांनी त्यांच्या भविष्याचं करिअरचं पाहिलेले उज्वल स्वप्न क्षणात धुळीस मिळवत आहेत हे ते लक्षात न घेता दुचाकीवर ट्रिपल सीट बसुन हॉर्नचा कर्कश्श आवाज करत, फिरत आहेत खरे तर तरुणांना वाचवण्यासाठी किंवा तडजोड करण्याच्या भूमिकेने आलेल्या पोलीस ठाण्यात येणार्या या गाव पुढार्यांनाही त्याच भाषेत उत्तर देण्याची पोलिसांनी भूमिका घ्यावी याची आवश्यकता आहे. सोशल मीडियावर होणारे वाद आता चौकाचौकात होऊ लागले आहेत. असे प्रकार ग्रामीण भागातही घडू लागले आहेत, ही चिंतेची बाब असून विचार करण्याची आवश्यकता आहे. कायदा सुव्यवस्थेला कोणी आव्हान देण्याचा प्रयत्न करीत असेल, तर पोलिसांनी आता गुळगुळीत भूमिका न घेता पोलीस स्टाईलने खाकीचा धाक दाखवण्याची गरज आहे अशा बेधुंद तरुणाईला, मस्तावलेल्या गुन्हेगारांना वेळीच आवर घातला पाहिजे अन्यथा अशांचा उच्छाद स्वतः च्या कुटुंबाला, गावाला, समाजाला, नव्हे राष्ट्राच्या एकात्मेताला ही मारक ठरणार हे मात्र नक्की!