पत संस्थाचालकांनो एकदाचे सांगून टाका तुमची संस्था डब्यात गेली म्हणजे कायद्याच्या मार्गाने लोकं लढा उभारतील

बीड । निवेदक
एका बाजूला ढिग झाला तर दुसर्‍या बाजूला खड्डा होणारच असा काही प्रकार गत 2023 च्या वर्षापासून बीड शहरामध्ये पतसंस्थाचालकांच्या बाबतीच घडला आहे. बीडमध्ये जिजाऊ मॉसाहेब, परिवर्तन, मातोश्री, साईराम, राजस्थानी मल्टीस्टेट पतसंस्थाचालकांनी नागरिकांचा पैसा हा इतर ठिकाणी गुंतवणूक केल्याचे चर्चा होत आहे आणि त्यात ते कुठे वजा झाले त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा ढिग झाला आणि दुसर्‍या बाजूला खड्डा हा खातेधारक नागरिक यांच्या वाट्याला गेल्या वर्षभरापासून आल्याने बीड जिल्ह्यातील बाजारात शुकशुकाट जाणवत आहे त्यामुळे पत संस्थाचालकांनो सांगून टाका तुमची संस्था डब्यात गेली म्हणून ज्या लोकांनी संयम बाळगला आहे ते सरळ सरळ कायद्याच्या चाकोरीतून लढा उभा करतील.
ज्ञानराधा पतसंस्थेच्या दारात सकाळी 6 वाजल्यापासूनच लोकांच्या रांगा लागतात. तर माँसाहेब, परिवर्तन, मातोश्री, साईराम, राजस्थानी मल्टीस्टेट यांच्याबद्दल कधी उघडणार आहे याची माहिती घेण्यासाठी लोक आतूर असतात. ज्ञानराधाकडून गेल्या दोन दिवसात आरटीजीएसला देखील प्रॉब्लेम आल्याने पैसे घेतल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही असा चंग बांधत नागरिकांच्या वतीने सचिन उबाळे यांनी ज्ञानराधाचे अध्यक्ष सुरेश कुटे यांच्याशी संपर्क साधेपर्यंत उठणार नाही अशा निर्णय घेतल्याने सुरेश कुटेंशी बोलणे झाले व आरटीजीएसला टेक्नीकल प्रॉब्लेम आहे असे म्हणून सुरेश कुटे यांनी दिवस पुढे ढकलला तर इतर पतसंस्थेच्या बाबतीतही याहीपेक्षा भिषण आणि भयावह परिस्थिती असल्याने अडकलेला पैसा मिळेल का नाही यामुळे नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे. इतर पतसंस्थांच्या शाखा बंद आणि ग्राहकांना वेळेवर पैसे न मिळाल्याने त्यांची आर्थिक अडचण वाढत त्यांनी शासन दरबारी तक्रारी, आंदोलने करत पोलीस ठाण्यात सतत निवेदन देत आहेत.
सर्वच पतसंस्थामध्ये गेल्या वर्षभराचा ताळेबंद जुळता न झाल्याने तसेच कर्जाचे वाटप आणि वसुलीचे प्रमाण यामध्ये कमालीचा फरक जाणवल्याने एनपीए थकबाकीचे प्रमाण वाढले. पतसंस्था अडचणीत आल्या, त्यामुळे जिजाऊ मॉसाहेब, परिवर्तन, मातोश्री, साईराम, राजस्थानी मल्टीस्टेट अशा नावाजलेल्या पतसंस्थामधून ठेवीदारांचा हक्काचा पैसा त्यांना परत मिळाला नाही यामुळे सतत व्हिडीओद्वारे नागरिकांपुढे येणे, कुठे पतसंस्थेच्या दारात पैसा सुरक्षित आहे असे बॅनर लावून वेळ मारुन नेण्यापेक्षा सांगूनच टाका तुमची संस्था डब्यात गेली आहे. संपुर्णपणे आम्ही कर्जबाजारी झालो आहोत याविषयी निर्णय मग माननीय न्यायालय घेईल, तुमच्या प्रॉपर्टी जप्त करेल, नागरिकांचा पैसा त्यांना मिळण्याचा मार्ग देखील मोकळा होईल.
साईरामची चुप्पी
ज्ञानराधा पतसंस्थेचे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांच्याप्रमाणेच साईरामचे साईनाथ परभणे हे देखील नागरिकांना संंयम राखण्याचे आवाहन व्हिडीओद्वारे करत होते. पैसा सुरक्षित असल्याचे सांगत होते. परंतू नागरिकांचे पैसे परत कधी देणार याबाबत त्यांनी तसा शब्द खातेधारकांना दिलेला नाही.

Leave a comment