पुरोगामी महाराष्ट्राची लक्तरं वेशीवर टांगलेली !
जागतिक महिला दिन विशेष
बीड । निवेदक
काही वर्षापुर्वी बीड जिल्ह्यातील स्त्रीभु्रण हत्येच्या दुर्देवी घटनेने राज्य हादरुन सोडले होते. हा विषय थोडा दुरच राहू द्या परंतू गत वर्षीच्याच काही घटना आणि ज्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्या होत्या त्याचे मथळे असे की, जमीनीच्या वादातून आदिवासी महिलेवर अत्याचार, चालत्या गाडीत महिलेवर तिघांचा अत्याचार, अत्याचार करुन मुलीला विषारी औषध पाजले, पिडीत महिलेला गावातून हद्दपार हे मथळे सोडून द्या काल परवा तर आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार अशा मथळ्याखाली बातमी छापून आली होती. संपुर्ण महाराष्ट्रात महिला अत्याचारात बीड जिल्हा अगोदरपासून पुढे राहिलेला आहे आणि आता त्याचा वाढता रेशिओ हा पुरोगामी महाराष्ट्राची लक्तरं वेशीवर टांगल्याचा प्रकार होत आहे. विशेष म्हणजे खासदार महिला, जिल्हाधिकारी महिला असतांना देखील महिला अत्याचार प्रमाण कमी होत नाहीये.
गेल्या 10 वर्षापुर्वी बीड जिल्हा स्त्रीभ्रुण हत्येच्या घटनेने बदनाम झाला होता हे फक्त 10 वर्षापुर्वी उघड झाले होते परंतु पुर्वीपासूनच हा निंदनीय प्रकार चालू असल्याने त्याची परतफेड आज आणि येणारा काळ देखील मुलांना लग्नासाठी मुली भेटत नाहीत यामध्ये रुपांतरित झालेली आहे. स्त्रीला पुरोगामी महाराष्ट्रात रथाचे दुसरे चाक म्हटले जाते म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने स्त्री देखील काम करु शकते ज्यामुळे महापुरुषांच्या प्रतिमांसोबत त्यांच्या पत्नीचे किंवा आईचे प्रतिमापुजन केले जाते परंतू हे केवळ त्याच दिवशीचे असल्याचे चित्र असते त्यानंतर पाचवीला पुजलेले सत्र पुन्हा सुरु होते. कुठे महिलेवर अत्याचार, तर कुठे विष पाजले, कुठे माहेरावरुन पैसे घेवून ये म्हणून छळ, तर कुठे महिला आयोगात तक्रार, तर कुठे बालिकेवर नराधमाचा बलात्कार असे किळसवाणे प्रकार घडत असल्याने आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर अशा आरोपींना हत्तीच्या पायाखाली दिले असते परंतू दुर्देवाने याकडे पोलीस यंत्रणा देखील डोळेझाक करते कधी तक्रार स्वीकारली जात नाही तर कधी महिला पोलिस निरीक्षक असतांना देखील ती आरोपीला कठोर शिक्षा न देता तक्रार न घेण्याचा प्रकार घडतो. विशेष म्हणजे पोलीसांना महिन्यातून एकदा सुचना करु शकणार्या बीड मध्ये जिल्ह्याला खासदार महिला भेटल्या तसेच प्रशासनावर ज्यांचा वॉच असतो अशा जिल्हाधिकारी महिला जिल्ह्याला लाभल्या आणि वेळेवर पाणी न भेटण्यापासून ते महिलांसाठी स्वच्छतागृह देखील न उभारता येणार्या अकार्यक्षम मुख्याधिकारी यांच्यासारख्या उच्च पदावर महिला कार्यरत असतांना कुठेही लक्ष देत नाहीत त्यामुळे स्त्रीयांनी आता स्वबळावरच सक्षम होणे या शिवाय पर्याय नाही.