गरीबांचे थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून पुष्पछत्र फाउंडेशनकडून ब्लँकेटचे वाटप
बीड । निवेदक
मनुष्य हीच ईश्वर सेवा असे व्रत करुन बीड येथील पुष्पछत्र फाउंडेशनचे अध्यक्ष निता कुडके, उपाध्यक्ष राधा काकडे, सचिव संदीप कुडके, व प्रगती सवासे व इतर पदाधिकार्यांच्या उपस्थितीत वाढत्या थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी 501 ब्लँकेटचे वाटप केले.
‘मना-मनातून आला मंत्र, निर्माण करुया मायेच छत्र’ हे ब्रीद घेवून चाललेल्या बीड येथील पुष्पछत्र फाउंडेशन कडून मनुष्य हीच ईश्वर सेवा असे व्रत करुन थंडीपासून बचावासाठी पुरेसे ऊबदार कपडे नसल्यामुळे कडाक्याच्या थंडीत ज्या नागरिकांचेे हाल होत असतात अशा शहरातील चर्हाटा फाटा, बहिरवाडी, नाळवंडी नाका इत्यादी ठिकाणी जावून नागरिकांचे थंडीपासून संरक्षण व्हावे या हेतूने 501 ब्लँकेटचे वाटप केले.
पुष्पछत्र फाउंडेशनच्या या कार्याचे शहरातील ज्येष्ठ नागरिकांकडून, समाजसेवकांकडून कौतुक होत आहे.