डॉ.चव्हाणांच्या रुग्णसेवेचा नवभारत शिल्पकार पुरस्काराने झाला गौरव
बीड । निवेदक
नेहमी रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा म्हणून कायम रुग्णसेवेत राहून जनसामान्यांचे आरोग्य सदृड आणि सक्षम ठेवण्यासाठी अहोरात्र काम केल्याबद्दल नवभारत समुहाकडून त्यांच्या सक्ष आणि दक्ष रुग्णसेवेच्या सुकाणुधारी असलेल्या जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबई येथील ताजमह हॉटेलमध्ये नवभारत शिल्पकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, खा.पुनमताई महाजन, नवभारत समुहाचे एम.डी निमेष माहेश्वरी, नवभारत समुहाचे ग्रुप प्रेसिडेंट ए.श्रीनिवास यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.नागेश चव्हाण यांनी आपल्या रुग्णसेवेच्या काळात आतापर्यंत राष्ट्रीय कुटूंब नियोजन कार्यक्रमाअंतर्गत यशस्वीरित्या सव्वा लाख शस्त्रक्रिया करण्याचे विक्रम केले आहे. त्याचबरोबर किल्लारी येथे झालेल्या भुकंप दरम्यान दहा दिवस अहोरात्र तेथील जनसामान्यांना वाचविण्यासाठी काम करत उत्तम आरोग्यसेवा केली. कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत सालिंबा आणि मामला येथे प्लेग सदृक्ष रुग्ण आढळल्यानंतर तब्बल पाच वर्षे गावामध्ये जावून रूग्णांला गे्रट सेवा देण्याचे काम त्यांनी त्यांवी केली होती. तर 2017 ते 2022 दरम्यान जळगाव येथे सिव्हील सर्जन असतांना बेटी बचाओ बेटी पढाओ राष्ट्रीय कार्यक्रमात जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर रेड झोनमधून जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांमध्येक मनपरिवर्तन केल्याने जिल्हा ग्रीन झोनमध्ये आणला होता. यामुळे तत्कालीन केंद्रीय ग्रामविकास मंत्री तथ बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्याहस्ते त्यावेळी सन्मान करत कौतुक केले होते. या सर्व उत्कृष्ट कार्याची नवभारत समुहाकडून दखल घेत त्यांच्या कार्यावर आढावा टाकत त्याच्या ग्रेट कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आणि राज्याच्या हस्ते मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये दि.13 जानेवारी रोजी राज्यपाल रमेश बैस, खा.पुनमताई महाजन, नवभारत समुहाचे एम.डी निमेष माहेश्वरी, नवभारत समुहाचे ग्रुप प्रेसिडेंट ए.श्रीनिवास प्रमुख उपस्थिती मध्ये नवभारत शिल्पकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.