ॲड.अजिंक्य पांडव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

बीड । निवेदक
सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय नवी मुंबई महाराष्ट्र येथील कक्ष अधिकारी तथा महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण संस्थेच्या,नोंदणी अधिकारी डॉ.प्रियाताई देशपांडे यांनी “सुखकर्ता” या ॲड.अजिंक्य पांडव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला.महाराष्ट्र शासन अमृत संस्थेच्या माध्यमातुन सुरू असणाऱ्या विविध योजना, तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन,प्रशिक्षण आणि लघुउद्योजक निर्मिती या संदर्भात त्यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना डॉ.देशपांडे यांनी अमृत संस्थेची वाटचाल,स्वयं रोजगार प्रशिक्षण,लाभार्थी निकष व आवश्यक कागदपत्रे, विविध वित्त संस्था,बँका,पतसंस्था याच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यास अर्थसहाय्य निर्माण करून देणे,ज्या नोंदणीकृत लाभार्थ्यांनी कागदपत्रे पूर्ण केली आहेत त्यांच्याकरिता पुढील प्रक्रियेविषयी माहिती,आपल्या मनात असलेल्या इतर शंका यावर प्रश्नोत्तरे याचे निरसन करत उपस्थितांशी सहज आणि सरल सवांद साधला.उद्योजक होण्यासाठी तरुणांनी अमृत या शासन योजनेचा लाभ घ्यावा असे ही प्रतिपादन यावेळी केले. पुढे बोलताना म्हणाल्या की,जसे शासन आपल्या दारी अभियान सुरू आहे त्या पद्धतीने अमृत आपल्या दारी ही मोहीम आम्ही सर्व अमृतचे सहकारी राबवत आहोत खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांनी अमृत चा लाभ घ्यावा असे ही आवाहन या वेळी डॉ.देशपांडे यांनी केले यावेळी शहरातील ज्ञातीबांधव या बैठकीस मोठया संख्येने उपस्थित होते. मंत्रालयात न थांबता गरजू लाभार्थी यांना अमृत चा लाभ व्हावा यासाठी डॉ.देशपांडे प्रांजळ भावनेतून मराठवाडा दौरा करत आहेत याचे ही उपस्थितांनी कौतुक व अभिनंदन केले. यावेळी प्रेरक वैघ यांनी डॉ. प्रिया देशपांडे व उपस्थितांचे आभार मानले.
वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने भा.शि.प्रचे प्रशासकीय अधिकारी प्रा.चंद्रकांत मुळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते डॉ.प्रियताई देशपांडे व अमृतचे तालुका समन्वयक श्री.विशाल जोशी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वेळी सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.अजिंक्य पांडव, उपाध्यक्ष श्री.प्रेरक वैद्य,सचिव डॉ.गणेश आडगावकर, प्रा.नितेश अग्रवाल, श्री.स्वप्नील देशमुख, प्रा.श्रीकांत कुलकर्णी,प्रा.अभय पटवारी, श्री.गणेश जोशी श्री.महेश कुलकर्णी, श्री.राजू जोशी, श्री.गणेश देशमुख, श्री.अनिल जोशी, श्री.संजय कुक्कडगावकर, श्री.संजय डोळे, अंकित जोशी,श्री.प्रसन्ना कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.