ओबीसीच्या महाएल्गार मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित राहावे-डॉ.संजय तांदळे

बीड । निवेदक
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये, ओबीसींची जातीनिहाय जनगणना तात्काळ करावी या न्यायहक्काच्या मागणीसाठी ओबीसी बांधवांनी एल्गार पुकारलेला असून याचाच एक भाग म्हणून दि.13 जानेवारी 2024 शनिवार रोजी बीड शहरातील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर दु.3 वाजता मैदानावर ओबीसी भगिनी-बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे अखिल भारतीय वंजारी महासंघ तथा वंजारी विश्वचे जिल्हाध्यक्ष तथा ओबीसी व भटक्या जमाती कृती समितीचे सदस्य डॉ.संजय तांदळे यांनी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये तसेच ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना तात्काळ करावी या न्यायहक्काच्या मागणीसाठी दि.13 रोजी होत असलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्याला राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री धनंजय मुंडे, माजीमंत्री पंकजाताई मुंडे, माजीमंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर आदींची उपस्थित राहणार असून मान्यवर सभेला मार्गदर्शन करणार आहेत तरी या महाएल्गार सभेला बीड जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील लाखो ओबीसी समाज बांधवांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय वंजारी महासंघ तथा वंजारी विश्वचे जिल्हाध्यक्ष तथा ओबीसी व भटक्या जमाती कृती समितीचे सदस्य डॉ.संजय तांदळे यांच्यासह सतिश जायभाये, सुदाम कोळेकर, विकास वनवे आदींनी केले आहे.

Leave a comment