बीड । निवेदक
दि.13 जानेवारी 2024 शनिवार रोजी बीड शहरातील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर दु.3 वाजता मैदानावर होणार्या महा एल्गार सभेला ओबीसी महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन धनगर समाज अहिल्या महिला आघाडीच्या प्रदेश सचिव मिनाक्षी देवकते-डोमाळे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
पुढे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये, तसेच ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना तात्काळ करावी या न्यायहक्काच्या मागणीसाठी दि.13 रोजी होत असलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्याला राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, महादेव जानकर, पालकमंत्री धनंजय मुंडे, माजीमंत्री पंकजाताई मुंडे, माजीमंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर,टी.पी.मुंडे, गोपीचंद पडळकर, आदींची उपस्थित राहणार असून मान्यवर सभेला मार्गदर्शन करणार आहेत तरी या महाएल्गार सभेला बीड जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील लाखो ओबीसी समाज महिला भगिनींनी, युवतींनी व बांधवांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन धनगर समाज अहिल्या महिला आघाडीच्या प्रदेश सचिव मिनाक्षी देवकते-डोमाळे, अॅड.सुभाष राऊत, संदीप बेदरे, अर्जुन दळे यांनी केले आहे.