बीड (प्रतिनिधी)-दिनांक 22 रोजी श्री श्री रविशंकर विद्या मंदिर येथे राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीनिवास रामानुजन गुरुजींच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .नंतर शाळेतील सर्व गणित शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ अनिता सूर्यवंशी मॅडम यांनी मार्गदर्शन केले. गणित विषय शिक्षक महाजन सर , ै मनीषा शिंदे , अमृता देशपांडे , पूजा लांडे आदींची उपस्थिती होती.
दिनांक 21 डिसेंबर रोजी गणित विषयावर आधारित प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये गणित विषयासाठी लागणारे सर्व साहित्य विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले व त्याविषयीची माहिती इयत्ता सहावी सातवी व पाचवीतील विद्यार्थ्यांनी दिली. यामध्ये थ्रीडी शेपस् ,मनी ,पझल्स ,मेजरमेंट शी निगडीत सर्व साहित्य ,फ्रॅक्शन या व अशा भरपूर साहित्यांच्या प्रदर्शनीचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला .
या कार्यक्रमाच्या वेळेला इयत्ता सहावीतील श्रावणी डोंगरे ,स्वरांजली सोनवणे, प्रसन्ना भोंडवे,वेदिका कारगुडे या विद्यार्थ्यांनी गणित दिनाविषयी माहिती दिली . त्याचप्रमाणे इयत्ता दुसरीतील आरोही घरत व स्वरा पालवे या विद्यार्थिनींनी अंकांवरील एक गीत सादर केले . इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांनी शून्य ही कविता सादर केली .इयत्ता पहिलीतील श्रावणी या विद्यार्थिनीने पाढे म्हणून दाखवले .त्याचप्रमाणे इयत्ता दुसरीतील श्रेयश उंडाळे , सत्यजित थिगळे ,कात्यायनी देशमुख ,ईशांत गायकवाड विद्यार्थ्यांनी व इयत्ता पाचवीतील श्रावणी आगलावे ,बहिर तेजस्विनी , दीपा नवले , प्रांजल कुटे या विद्यार्थ्यांनी गणितातील वेगवेगळे प्रतिकृती बनवून आणलेल्या होत्या . त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने इयत्ता तिसरी ते आठवी विद्यार्थ्यांसाठी एका परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाच्या वेळी आपल्या भाषणामध्ये बोलताना शाळेच्या उपमुख्यध्यापिका अनिता सूर्यवंशी मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय गणित दिनाच्या शुभेच्छादिल्या व आपल्या दैनंदिन जीवनामध्ये गणित किती महत्त्वाचे आहे व आपल्या आजूबाजूला गणिताचा वापर कसा होतो याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली .सर्व कार्यक्रमाचे बहरदार सूत्रसंचालन निधी राऊत व स्वाराली इनामदार ने केले .व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शरयू गाढे र्ने मानले.