मागणीवरुन अंजनवती येथील शेतकरी आक्रमक
बीड । निवेदक
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकरी अगोदरच हैराण झाला आहे त्यातच केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी केल्यामुळे कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी अधिकच अडचणी आला आहे तसेच पेट्रोल व डिझेल मधे इथेनॉल न मिसळण्याचा निर्णय त्वरित मागे घेऊन दुधाला प्रति लिटर पन्नास रुपये भाव देण्यात यावा या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या प्रश्नी केंद्रीय कृषीमंत्र्याची भेट घेवून हा प्रश्न सोडवावा अन्यथा रस्त्यावर उतरू आंदोलन छेडू असा इशारा अंजनवती ग्रामस्थांनी दिला आहे.
पुढे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दुष्काळी परिस्थिती त्यातच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यातच केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी घोषित केल्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडला असून कांद्याचे भाव घसरल्यामुळे उत्पादन व झालेला खर्च याचा ताळमेळ लागत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे त्याचबरोबर पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करता येणार नाही त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा अडचणीत येणार असून दुधाचे दर अचानक घसरल्याने शेतकर्यांचा मुख्य जोडधंदा म्हणून ओळखला जाणारा दुग्ध व्यवसाय कोलमडून पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी तात्काळ केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट घेऊन कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी, पेट्रोल व डिझेल मधे इथेनॉल न मिसळण्याचा निर्णय त्वरित मागे घेऊन दुधाला प्रति लिटर पन्नास रुपये भाव देण्यात यावा या मागण्यांसाठी अंजनवती येथुन भाजपा किसान मोर्चाचे माजी बीड तालुकाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली वरील मागण्यासाठी एल्गार पुकारला असून मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे याप्रसंगी कृष्णा शिंदे, गोरख येडे, कल्याणराव येडे, नारायण पांचाळ, रामभाऊ येडे, अण्णा कारभारी,बाबुतात्या येडे, दादाराव येडे, भिमराव काटवटे, प्रल्हाद सोनवणे,मनोहर मोरे, साहेबखॉ पठाण,सुरेश मोरे, शेषेराव पाटील, भगवानभाऊ येडे, राजाराम थोरात, हरेकृष्ण काका,तुकाराम मोरे, बन्सीधर शिंदे, अंकुश चाळक, गोविंद भूमकर आदींची उपस्थिती होती.