दुरूस्तीच्या कामाकरिता अंबाजोगाई शहरातील काही भागाचा वीज पुरवठा बंद राहील

अंबाजोगाई (प्रतिनिधी)मोरेवाडी वीजवाहिनीच्या विलगीकरणाच्या कामानिमित्त 33 के.व्ही. अंबाजोगाई उपकेंद्रामधून वीजपुरवठा होणार्‍या 11 केव्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक, मोरेवाडी, हॉस्पीटल, जोगाईवाडी वीजवाहिनी तसेच लोखंडी व वाघाळा कृषी वीजवाहिनीवरील परिसराचा वीजपुरवठा आज ( शनिवार दि. 27) सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यंत बंद राहील.
11 के.व्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक वीजवाहिनीवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक, हौसिंग सोसायटी, नवामोंढा, गुरुवार पेठ, सावरकर चौक, प्रशांत नगर, छत्रपती संभाजी राजे चौक, आंबेडकर चौक,गवळीपुरा,पेशानपुरा, राजीव गांधी चौक, रमाई चौक या भागातील वीजपुरवठा पुरवठा बंद राहील. तसेच 11 केव्ही मोरेवाडी वीजवाहिनी यशवंतराव चव्हाण चौक,जयभीम नगर ,विद्युत कॉलोनी,बी,टी.मोरेनगर, आरकनगर,जुनी मोरेवाडी, मावली नगर ,नागशेन नगर,एकतमाता कॉलोनी ,गणेशनगर,संभाजीनगर, सदर बाजार, मियाभाई कोलोनी,शेतकी शाळा,येलडा रोड,गवळीपुरा,मिलिंदनगर,गांधीनगर,गुरुवार पेठ या भागातील विद्युत पुरवठा बंद राहील. 11 केव्ही. लोखंडी व वाघाळा कृषी वीजवाहिनीवरील सर्व वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित राहील. त्याचबरोबर 11 केव्ही हॉस्पिटल व जोगाईवाडी वीजवाहिनीवरील सर्व वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित राहील.तरी संबंधित सर्व वीज ग्राहकांनी याची नोंद घ्यावी. काम पुर्ण होताच तात्काळ वीजपुरवठा पुर्ववत करण्यात येईल.

Leave a comment