बीड जिल्ह्यात काँग्रेस स्वबळावर लढणार -राहुल सोनवणे

बीड । लक्ष्यवेध प्रतिनिधी
आगामी होवु घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज बीड येथे बीड तालुका व शहर काँग्रेस पदाधिकार्‍यांची बैठक जिल्हाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह बीड या ठिकाणी घेण्यात आली. या बैठकीस काँग्रेसचे बीड विधानसभा निरीक्षक अन्वर देशमुख, दादासाहेब मुंडे, प्रवीणकुमार शेप, गणेश बजगुडे पाटील, परवेज कुरेशी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी बीड तालुक्यातील आठ जिल्हा परिषद व सोळा पंचायत समिती गणांचा आढावा व वर्तमान परिस्थितीचा आढावा मांडला त्याच बरोबर शहराध्यक्ष यांनी शहराचा आढावा दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे, निरीक्षक अन्वर देशमुख, दादासाहेब मुंडे आदी पदाधिकार्‍यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने आपले मत व्यक्त केले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे म्हणाले की, काँग्रेस पक्ष स्वतंत्र विचारधारा असलेला राष्ट्रीय पक्ष असुन सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम करणारा देशातील एकमेव पक्ष आहे. देशात राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस सातत्याने सर्वसामान्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरत आहे. बीड जिल्ह्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग असुन अलीकडच्या काळात आघाडीच्या राजकारणात काँग्रेस जिल्ह्यात न लढल्यामुळे पक्ष संघटनेचे देखील नुकसान झालेले आहे. प्रामाणिक काम करणार्‍या कार्यकर्त्यांना मागील काळात लढण्याची संधी मिळाली नाही याची खंत आम्हाला देखील आहे. येणार्‍या काळात काँग्रेसला सन्मानजनक आघाडीत वाटा मिळाला तर आम्ही आघाडीत राहु नसता जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आमच्या नेत्या खासदार रजनीताई पाटील व माजी मंत्री अशोकराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस स्वबळावर लढणार असुन कार्यकर्त्यांनी पुर्ण ताकतीने निवडणुकीच्याकामाला लागावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राहुल भैया सोनवणे यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक इलियास टेलर, माजी नगरसेवक शफीक जमादार, फरीद देशमुख, शेख सिराज, रमेश पाटील, संतोष निकाळजे, विद्या गायकवाड, शेख मोहसीन, राहुल साळवे, गणेश करंडे, अक्षय मुळे, अमोल पाठक, गणेश जवकर, शेख कादर बाबमिया, भैय्या गोरे, ओंकार नवले, अविनाश डरपे, पिनू डांगे, श्रीमंत घोडके, लक्ष्मण पवळ, कल्याण टेकाळे, अशोक जोगदंड, अशोक बहिरवाल, आकाश मस्के, मिलिंद मस्के, विशाल साबळे, आशिष सोनवणे, शेख मुशर्रफ, शेख साद, इंजि. जमील अन्सारी, सय्यद फरहान, आदित्य मस्के, शेख नेहल, सोफियान शहा, आहेतशाम शेख, सफदर देशमुख, शेख अब्बास, शेख जहीर, शेख जमील यांच्यासह असंख्य पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.

Leave a comment