
मुंबई (प्रतिनिधी)-काल झालेल्या एअर इंडिया एआय-171 विमान अपघातातील प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी महाराष्ट्र सरकारने आपत्ती व्यवस्थापन प्रभाग मंत्रालयामार्फत मदतकक्ष स्थापन केला असून संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे.
काल दि.12.06.2025 रोजी एअर इंडिया एआय-171 या अहमदाबाद-लंडनकडे जाणार्या विमानाचा देशात शतकामधील सर्वात मोठा विमान अपघात झाला. सदरील अपघाताची चित्र पाहिल्यानंतर अनेकांचे मन गहिवरले आहे शासनाने देखील मन सुन्न करणारी घटना आहे असे सांगितले असून महाराष्ट्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग मंत्रालयामार्फत नागरिकांसाठी मदत व माहिती सेवा उपलब्ध करुन दिली जात आहे त्यासाठी नागरिकांनी 022-22027990, 022-22794229, 3921587143, 1070 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे करण्यात आले आहे.