माफी मागा, माफी मागा विजय वडेट्टीवार माफी मागा-नरेंद्राचार्य महाराज यांचे भक्त आक्रमक

बीड (प्रतिनिधी)- काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद विधान केल्याने बीडमध्येआज नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी संतप्त झाले असून त्यांनी निषेध मोर्चा काढून काळ्या फिती हाताला बांधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केलं आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अनुयायी म्हणाले की, नरेंद्राचार्य महाराज हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असून, त्यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट आहे
त्यामुळे वडेट्टीवार यांनी तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अनेकांनी हातात पोस्टर आणि फलक घेत निषेध नोंदवला. संत महाराजांच्या बाबतीत अशी वक्तव्ये करणे अयोग्य असून, त्यामुळे लाखो भक्तांच्या भावना दुखावल्या जातात, असे मत आंदोलकांनी व्यक्त केले. संत हे समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करतात. अशा पवित्र व्यक्तीबद्दल अनादराची भाषा वापरणे माफ होणार नाही, असे एका भक्ताने सांगितले.
वडेट्टीवार यांनी जाहीर माफी मागावी
नरेंद्राचार्य महाराजांचे भक्तगण आणि अनुयायांनी यासंबंधी तातडीने जाहीर माफी मागा अशी मागणी केली आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. संत, महात्मे आणि धार्मिक गुरू हे समाजाला चांगल्या दिशेने नेण्याचे कार्य करतात. त्यामुळे अशा पवित्र व्यक्तींबद्दल बोलताना जबाबदारीने वक्तव्य करणे आवश्यक आहे.

Leave a comment