अ‍ॅटोरिक्षामध्ये विसरलेला 75 हजारांचा कापडमाल जिल्हा वाहतुक शाखेने तातडीने दिला सापडून

बीड (प्रतिनिधी)- शहरातील मोमीनपुरा येथे अंजुम शेख (रा.लोहारा जि.धाराशिव) यांनी रमजान निमित्त कपडे व इतर 75 हजार रुपयांच्या वस्तू खरेदी केल्या होत्या. सदरील वस्तु त्या परत लोहारा येथे घेवून जाण्यासाठी बस स्थानकावर आल्या होत्या परंतू रिक्षामधून उतरताना घाईगरबडीत काही सामान नजरचुकीने रिक्षामध्ये राहीले होते हे लक्षात आल्यावर त्यांनी वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांना सांगितले यावर श्री.जाधवर यांनी सदरील रिक्षावाल्याचा शोध घेवून अंजुम शेख यांचा माल परत मिळवून दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, मुस्लीम बांधवांचा 2 मार्च पासून रमजान सुरु होत आहे त्यानिमित्त खरेदीसाठी शहरातील मोमीनपुरा येथे लोहारा जि.धाराशिव येथील अंजुम शेख ही महिला व तिच्या सोबत तिची सहकारी आल्या होत्या. अंजुम शेख व त्यांच्या सहकारी यांनी खरेदी केल्यानंतर कपड्याचे व खरेदी केलेल्या वस्तुंचे पोते बांधून अ‍ॅटोमध्ये बसस्थानकाकडे गेल्या दरम्यानच तेथे बसची गर्दी होवू लागल्याने शेख अंजुम व सहकारी या रिक्षातून उतरल्या. याच दरम्यान उतरतांना त्यांच्याकडून काही सामान त्या रिक्षामध्ये राहीले हे उशिरा अंजुम शेख यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने तेथे उपस्थित असलेले वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर आणि वाहनचालक अंमलदार कदम व इतर सहकारी यांना ही माहिती दिली यावर विजय जाधवर यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून सदरील रिक्षावाला कोण हे शोधले व अंजुम शेख आणि सहकारी यांचा विसरलेला 75 हजार रुपयांचा माल परत मिळवून दिला त्यामुळे नागरिकांत पुन्हा एकदा बीड पोलीसांबद्दल विश्वासर्हता कायम राहिली असून पोलीसांच्या कामामुळे कौतुक करत समाधान व्यक्त होत आहे.

Leave a comment