स्व.गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी पंकजा मुंडेंना दिली त्यांना दिल्लीला पाठवा – पंतप्रधान

अंबाजोगाई येथे प्रचारसभा

बीड । निवेदक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अंबाजोगाई येथे प्रचारसभा पार पडली. बीडच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारसभेत मोदींनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. गोपीनाथ मुंडे यांच्याकडे माझ्यापेक्षाही जास्त अनुभव होता’; मला माझे अनेक सहकारी गेल्या 10 वर्षात गमवावे लागले. गोपीनाथ मुंडे, अरुण जेटली, सुषमा स्वराज, मनोहर पर्रीकर. तुम्ही कल्पना करु शकता का,जेव्हा आपले गेले तेव्हा माझ्या अडचणी किती वाढल्या असतील? त्यामुळे या सर्व सहकार्‍यांची मला खूप आठवण येते, मी इथे आलो आहे ते तुमच्याशी बोलण्यासाठीच भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनामुळे माझे व्यक्तिगत मोठे नुकसान झाले. येणार्‍या 13 मे रोजी गोपीनाथ मुंडेंची कन्या पंकजा मुंडे यांना भरघोस मताने विजयी करून त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिल्लीला पाठवा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वारकरी सांप्रदायाचा फेटा, शौर्याच प्रतिक दांडपट्टा व कष्टकरी समाजाच प्रतिक घोंगडी व काठी देवून पंकजाताई यांच्याकडून पंतप्रधान मोदींचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलतांना ते म्हणाले की,मी संत भगवान बाबा संत नारायण महाराज यांना नमन करतो. योगेश्वर देवीला प्रमाण करतो. बीडचे आमचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत हृदयाचं नातं राहिलेलं आहे. ते नेहमी मला बीड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी चर्चा करत होते. मी त्यांना भावपूर्ण याद करत आहे. सहकार्‍यांनो माझं एक दुर्दैवं राहिलंय, तुम्ही मला 2014 मध्ये देशसेवेची जबाबदारी दिली तेव्हा मी देशभरातील गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या सहकार्‍यांना निवडून दिल्ली घेऊन गेलो होतो, जेणेकरुन आम्ही एकत्रपणे देशाची सेवा करु. गोपीनाथ मुंडे यांच्याकडे माझ्यापेक्षाही जास्त अनुभव होता. पण माझं हे दुर्दैवं राहिलं की, सत्तेत आल्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये मला माझ्या सहकार्‍याला गमवावं लागलं, असं नरेंद्र मोदी म्हणाले. त्यामुळे स्वभाविकपणे गोपीनाथ मुंडे यांची आठवण येणं, मला ती कमी जाणवते
पुढे आपल्या भाषणादरम्यान विरोधकांवर कडाडून टिका करतांना ते म्हणाले की, इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर मोदी सरकारच्या योजना कॅन्सल करतील, काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं सरकार राम मंदिरही कॅन्सल करेल, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बीडच्या अंबाजोगाई येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे यांच्या प्रचारसभेत पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडी राम मंदिरही कॅन्सल करेल इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर हे लोक मोदींची किसान सन्मान निधी योजना कॅन्सल करतील. गरीबांना मोफत रेशन देण्याची योजना कॅन्सल करतील, 55 कोटी गरीबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची योजना देखील काँग्रेस कॅन्सल करेल. इतकंच नाही, तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीवाले राम मंदिरही कॅन्सल करेल असे पंतप्रधान हे पंकजा मुंडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अंबाजोगाईमध्ये झालेल्या सभे दरम्यान म्हणाले.
इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर हे लोक मोदींची किसान सन्मान निधी योजना कॅन्सल करतील. गरीबांना मोफत रेशन देण्याची योजना कॅन्सल करतील, 55 कोटी गरीबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची योजना देखील काँग्रेस कॅन्सल करेल. इतकंच नाही, तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीवाले राम मंदिरही कॅन्सल करेल.
मी आज तुमच्याकडे काही मागायला आलोय. मला तुमचे आशीर्वाद पाहिजे आहेत. माझी संपत्ती तुम्ही आहात. तुम्हीच माझे कुटुंब आहात. माझा देश माझे कुटुंब. एका काँग्रेस नेत्याने ज्याने काही दिवसा पूर्वी काँग्रेस सोडली. त्यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. ज्यावेळी राम मंदिराचा निकाल आला, त्यावेळी शहजाद्याने म्हटलं होतं की, काँग्रेस सरकार आल्यावर राम मंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बदलणार होते, असं वक्तव्य मोदींनी केलं आहे.

‘काँग्रेससोबत नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी’
आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान म्हणाले की, हा मोदी आहे, तुम्हीसुद्धा जाणता, मी आपल्याला गॅरंटी देतो, जोपर्यंत मोदी जिवंत आहे, दुनियाची कोणतीही ताकद दलित, वंचित, मागस, ओबीसींचं आरक्षण मागे घेऊ शकत नाही ही मोदीची ताकद आहे. आज कोणतीही राष्ट्रवादी ताकद काँग्रेससोबत उरलेली नाही. असली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा असली शिवसेना पक्ष भाजपसोबत आहे, आणि काँग्रेससोबत कोण आहे? नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेस, आणि हे करत काय आहेत? ते नकली वचन देत आहेत. नकली व्हिडीओ बनवत आहेत, असा घणाघात नरेंद्र मोदींनी केला.

कोण काय म्हणाले
मुख्यमंत्री शिंदे : काही लोक मराठा समाजात संभ्रम पसरवत आहेत आमच्या सरकारने 10% आरक्षण दिले आहे ते कोर्टात टिकविल आहे.
पंकजा मुंडे : पंतप्रधानांकडे हट्ट करुन ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातील कोयता काढून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच देशाचे भले करण्यासाठी विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढवायची आहे.
धनंजय मुंडे : ही विजयी संकल्प नव्हे तर विजयावर शिक्कामोर्तब करणारी सभा आहे.
चंद्रशेखर बावनकुळे-जिल्ह्याचा विकास सर्वात जास्त पंकजाताईच्या काळात झाला.
आ.सुरेश धस:कोरोनाच्या काळात एका तरी तालुक्याला भेट दिलेला फोटो बजरंग सोनवणे यांनी दाखवावा.
अमरसिंह पंडित : जिल्ह्यातील जनतेने विकासाची दृष्टी ठेवून पंकजाताईंना मतदान करावे.
भिमराव धोंडे : राज्यातील जनता पंकजाताईंना वाघीण म्हणते पण मी तर त्यांना झाशीची राणी म्हणतो.

Leave a comment