स्वरगंध करा ओके क्लबने फुलवला विठ्ठल भक्तिगीतांचा मळा

बीड । निवेदक
आषाढी एकादशी निमित्त सायंकाळी बीड शहरातील विठ्ठल साई मंदिरात विठ्ठल भक्तीगीतांची सुरेल अशी भक्तीसंध्या सादर करून, तिथे उपस्थित भक्तांना मंत्रमुग्ध केले.
या बाबत सविस्तर वृत्त असे की आषाढी एकादशी च्या पावन पर्वात अवघा महाराष्ट्रातील लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असणार्‍या विठुमाऊली चा गजर चालु असताना मागील काही आठवड्यापासून असंख्य भक्तगण विठ्ठलाच्या भेटीसाठी शेकडो किलोमीटर चे अंतर पायी चालत जावून आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनासाठी आतुर होते त्याच भक्तिभावाने बीड मधील अनेक विठ्ठल मंदिरात ही भक्तीभावानं अनेक भक्त पोहचले होते. बीडकरांच श्रध्दास्थान विठ्ठल साई मंदिरात काल स्वरगंध कराओके क्लब च्या गायक गायिकांनी काल विविध भक्तिगीते सादर केली. या स्वराभिषेकाचा प्रारंभ स्वरगंध कराओके क्लबच्या संचालिका सुवर्णा धुतेकर कुलकर्णी यांनी ओंकार प्रधान रूप गणेशाचे या गीताने केला तर क्लब चे मुख्य प्रशिक्षक प्रा.अभय पटवारी यांनी विठू माऊली तु माऊली जगाची,व देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा ही गीते प्रभावी पणे सादर केली.
पुढे या कार्यक्रमात प्रियंका भंडारी यांनी विठ्ठल नामाची शाळा भरली , सुनिता केंडे यांनी देव माझा विठु सावळा , राजेशकुमार जोगदंड यांनी तुझे रूप चित्ती राहो, मंजूषा गोहेल यांनी कानडा राजा पंढरीचा ,दीपक धनवे यांनी मागतो मी पांडुरंगा हेच एक दान , शोभा शृंगारे -जोगदंड यांनी चंद्रभागेच्या तीरी ,ऍड.मनीषा दळवी यांनी धरिला पंढरीचा चोर ,आरती परळकर यांनी विठ्ठलाच्या पायी वीट ,अशा भारती यांनी तुज मागतो मी आता ,ऍड वर्षा दळवी यांनी केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा ,अनुराधा कौंडण्य यांनीअवघे गरजे पंढरपूर ,राजू भैय्या यांनी शोधिसि मानावा राऊळी मंदिरी ,पूजा जोशी यांनी गेला हरी कुणा गावा ही एकाहून एक सरस गीते गायली याच कार्यक्रमात मीनाक्षी देशमुख यांनी पारंपरिक एकादशी सादर केली तर या भक्तीसंध्येचा समारोप सुवर्णा धुतेकर- कुलकर्णी यांनी रामा रघु नंदना ही भैरवी गाऊन केला .या स्वरसंध्येचं निवेदन प्रा.अभय पटवारी यांनी अनेक ऐतिहासिक व भक्तीमय संदर्भ देत अतिशय प्रभावी पद्धतीनं केले .
या कार्यक्रमासाठी विठ्ठल साई प्रतिष्ठान चे अशोकराव जगताप यांचे विशेष सहकार्य लाभले तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार कुलकर्णी ,सुमित कुलकर्णी ,दीपक धनवे,राजेशकुमार जोगदंड,राजूभैय्या यांनी विशेष परिश्रम केले.या भक्तीसंध्येचा रसास्वाद बहुसंख्य श्रोतावर्गाने घेतला व सर्वच भक्तीगीतांना उत्स्फूर्त दाद दिली.

Leave a comment