बीड जिल्ह्यात सौर ऊर्जा फॉर्म भरण्याची संख्या सर्वात जास्त
गेवराई । निवेदक
बीड जिल्ह्यातील शेतकर्यांनी सौर ऊर्जा योजनेचे शेतकरी वर्गाने ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत त्यांना तात्काळ सौर ऊर्जा मिळणे आवश्यक आहे अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी मुख्य अभियंता लातूर परिमंडळ व अधीक्षक अभियंता बीड महाऊर्जा कार्यालय बीड यांच्या कार्यालयात भेट देऊन मागणी केलेली आहे. बीड जिल्ह्यात सर्वात जास्त 1.25 लाख शेतकरी वर्गाने सौर ऊर्जा ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत परंतु त्यावर अद्याप पर्यंत कसल्या प्रकारची कार्यवाही झाली नाही असे प्रत्यक्ष निदर्शनास आलेले आहे. मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा मागासलेला असून उद्योग दळणवळणाचे साधन उपलब्ध नाही त्यामुळे अनियमित ऊर्जामुळे शेतकरी वर्ग शेतीला पाणी देऊ शकत नाही त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे सदरील ऊर्जा प्रकल्प बीड जिल्ह्यासाठी लवकरात लवकर कार्यान्वित करून त्याचा लाभ सर्व बीड जिल्ह्यातील शेतकरी वर्गांना मिळणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील शेतकरी वर्ग हा शेतीवर अवलंबून असल्यामुळे दिवसेंदिवस आर्थिक उत्पन्न कमी होत असल्याने आत्महत्या करीत आहे ही बाब गंभीर आहे अशा स्थितीत त्याला तात्काळ सौर ऊर्जा मिळणे आवश्यक आहे त्याशिवाय शेतकर्याची आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही त्यासाठी युद्ध पातळीवर उच्च पातळीवर कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणे आवश्यक आहे. इतर जिल्ह्याच्या मानाने बीड जिल्ह्यात सौर ऊर्जा फॉर्म भरण्याची संख्या सर्वात जास्त असल्याने त्यांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष अनिल बोर्डे, मोहन राजहंस, गणेश रामदासी, विश्वास चपळगावकर आदींनी निवेदनाद्वारे केलेली आहे.