सोळंके यांच्या पेट्रोलपंपावरील कर्मचारी करु लागले मापात पाप

बीड । निवेदक
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक यांच्या पुतळ्यानजदीक असलेल्या सोळंके यांच्या पेट्रोलपंपावरील कर्मचारी पेट्रोल भरणार्‍यास आलेल्या ग्राहकांना मीटर सेट न करता पेट्रोल देतात विशेष म्हणजे कोणी मीटर सेट करुन द्या असे म्हटल्यावर उद्धट उत्तरे देवून वाद घालतात त्यामुळे या पेट्रोलपंपावर या अगोदर अनेकदा ग्राहक आणि पंपावरील कर्मचारी यांचे मोठे वाद झाल्याचे प्रकार घडले आहेत.
शहरातील सोळंके पेट्रोल पंपावर ग्राहकाच्या म्हणण्याला न जुमानता त्याची पिळवणूक होत आहे. मीटरकडे लक्ष नसताना इंधन टाकणार्‍या नोझलमध्ये हातचलाखी करून ‘मापात पाप’ केले जात आहे. ‘0’ रिंडिग न करताचा बाइकमध्ये पेट्रोल सोडले जाते. याबाबत ग्राहकांनी केलेल्या तक्रारी केराच्या टोपलीत टाकल्या गेल्याचा अनुभव येतोय. पेट्रोल पंपांवरील ही लूट थांबविण्यासाठी जिल्हा पुरवठा विभाग, वैधमापनशास्त्र विभाग, पेट्रोलियम कंपन्याचे अधिकारी यांच्याकडून ‘ऑन दी स्पॉट’ कारवाईची गरज आहे.
सोळंके पेट्रोल पंपावर ग्राहकांना दुचाकी वाहनात पेट्रोल कमी सोडण्याच्या तक्रारींत सातत्याने वाढ झाली आहे. तसेच या पेट्रोल पंपांवर सुट्या पैशांचा वाद, ग्राहकांचे लक्ष नसताना मीटरची गती वाढविणे,कर्मचार्‍यांचे उर्मट बोलणे या तक्रारी आहेत सर्व ग्राहकांनी जागृती दाखवल्यास अशा मापात पाप करणार्‍या कर्मचार्‍यांना वचक बसू शकतो.
पेट्रोल पंपावरील वजन मापे व किमतीत त्रुटी आढळल्याने कंपनीच्या अधिकार्‍यांनी यापुर्वी एका मोठ्या नेत्याच्या पेट्रोलपंपास सील ठोकल्याचा प्रकार बीड-नगर रोडवरच घडला होता.

Leave a comment