बीड । निवेदक
मराठा आरक्षणासाठी मौजे अंजनवती येथे साखळी उपोषण सुरु आहे. आज दि.6 डिसेंबर 2023 रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
बीड तालुक्यातील मौजे अंजनवती येथे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गावकर्यांतर्फे साखळी उपोषण सुरु आहे आज दिनांक 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे त्याचे औचीत्य साधत उपोषणस्थळी या महामानवाला अभिवादन करण्याचा निर्णय गावकर्यांनी घेतला त्या अनुषंगाने बाबासाहेबांच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी आंबेडकरांच्या संघर्ष, त्याग, स्वाभिमान व समर्पण या गोष्टींवर प्रकाशझोत टाकताना भाजप किसान मोर्चाचे माजी बीड तालुकाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांनी सांगितले की परम पूज्य बाबासाहेबांनी समाजातील सर्वच उपेक्षित व तळागाळातील लोकांना सन्मान प्राप्त करून देण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केल्यामुळे आज समानता प्रस्थापित झाल्याचे सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतभूमीची आदर्श ओळख संपूर्ण जगात निर्माण केली असे सांगतानाच अंजनवती येथे सर्व जाती-धर्मांनी एकत्रित येऊन साखळी उपोषणामधे भाग घेतला हा छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहूजी महाराजांच्या विचाराचा विजय असल्याचे सांगितले. यावेळी अंजनवतीचे सरपंच कैलासदादा येडे पाटील, नारायण पांचाळ, तुकाराम थोरात, महादेव परदेशी, भिवाजी सोनवणे, श्रीरंग येडे पाटील, नारायण येडे पाटील, रामहरी चाळक, ह.भ.प. तुकारामबुवा सगळे, कैलासराव जाधव, बप्पासाहेब शिंदे, सुभाषआबा येडे पाटील, दशरथदादा सोनवणे, सुरेश मोरे पाटील, पंजाब सोनवणे, हरिश्चंद्र येडे पाटील, कृष्णा शिंदे, रामहरी आनंदराव येडे पाटील, अण्णा कारभारी, बालाजी जोगदंड यांच्यासह अनेक गावकर्यांची उपस्थिती होती माजी उपसरपंच शहाजीराव सोनवणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.