बीड । निवेदक
केंद्रीय निवडणुक आयोगाकडून दि.25 जून 2024 ते 25 जुलै 2024 दरम्यानच्या कालावधीत मतदान नाव नोंदणी कार्यक्रम जाहीर केला असून सज्ञान नागरिकांनी तात्काळ नाव नोंदणी तसेच मतदार धारकांच्या कार्डची दुरुस्ती करुन घ्यावी असे आवाहन पत्रकाद्वारे मा.नगरसेवक भैय्यासाहेब मोरे यांनी केले आहे.
पुढे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, देशात 2024 या वर्षी महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर येथे विधानसभा निवडणुका होत असून त्या निवडणुकीच्या तसेच महाराष्ट्रात देखील लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे नगरपालिका, महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांमध्ये त्या-त्या भागातील नागरिकांनी मतदारापासून वंचित राहू नये म्हणून केंद्रीय निवडणुक आयोगाकडून दि.25 जून 2024 ते 25 जुलै 2024 दरम्यानच्या कालावधीत मतदान नाव नोंदणी कार्यक्रम जाहीर केला तरी आपले नाव नोंदणीसाठी संपुर्ण नाव, संपुर्ण पत्ता, आधार कार्ड, मोबाईल नंबरसह जावून आपले नाव नोंदणी करुन घ्यावे या करीता 18 वर्षे पुर्ण झालेल्या तरुण-तरुणींनी निवडणुक आयोगाच्या https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर जावून प्रत्यक्ष नाव नोंदणी करावी असे आवाहन मा.नगरसेवक भैय्यासाहेब मोरे यांनी केले आहे.