बीड ( प्रतिनिधी) संभाजीनगर व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील माजी सैनिक पेन्शन व स्पर्श संबंधी असलेल्या अडचणी चे निवारण करण्यासाठी दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी मराठवाडा विभागातील सर्व माजी सैनिक ,वीर नारी, वीर पिता ,वीरमाता ,व सर्व वयोवृद्ध सैनिकांकरिता ९७ आर्टिलरी ब्रिगेड येथील सर्वत्रा ऑडिटोरियम छावणी येथे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पेन्शन व स्पर्श संबंधी सैनिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड ,परभणी ,हिंगोली, नांदेड, लातूर ,धाराशिव या जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक वीर नारी वीर माता-पिता व वयोवृद्ध सैनिकांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यात पेन्शन व स्पर्श संबंधी व अन्य अडचणीचे निरासन करण्याकरिता प्रधान नियंत्रण रक्षा लेखा कार्यालय पुणे येथील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
वन रँक वन पेन्शन व अन्य शासकीय योजना बाबत माहिती व मार्गदर्शन प्रधान नियंत्रक रक्षा लेखा कार्यालय पुणे येथील प्रतिनिधी मार्फत करण्यात येणार आहे.
ज्या माजी सैनिकांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना पेन्शन व स्पर्श संबंधी अडचणी असतील त्यांनी येताना पेन्शन संबंधी सर्व मूळ कागदपत्रे व अडचणी संबंधातील हिंदी किंवा इंग्रजी मध्ये तीन प्रतीत अर्ज घेऊन यावा. ज्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना लिहिणे बोलणे व आपली बाजू मांडणे शक्य नाही त्यांनी त्यांच्या कुटुंबातील योग्य व्यक्तीस सोबत आणावे म्हणजे प्रतिनिधी प्रधान नियंत्रण रक्षा लेखा कार्यालयाच्या प्रतिनिधी सोबत आपली बाजू मांडू शकेल .त्यामुळे त्यांचे निरासन करण्यास मदत होईल. सदर मेळाव्यास येणाऱ्या सर्व माजी सैनिकांकरिता मध्यवर्ती बस स्थानक, सिडको बस स्थानक व रेल्वे स्टेशन ते ९७ आर्टिलरी ब्रिगेड सर्वत्रा अडॉटोरीयम छावणी छत्रपती संभाजीनगर पर्यंत जाण्या-येण्याकरिता सैनिकी परिवहनाची तसेच चहा पान व दुपारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे तरी सर्व माजी सैनिकांनी व कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन ब्रिगेड कमांडर ९७ ब्रिगेड व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे