बीड । निवेदक
श्रीक्षेत्र मुक्ताईनगर पासून आषाढी वारी करत 17 जुलैला आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरला निघालेल्या संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे आज बीड शहरात भव्यदिव्य स्वागत करण्यात आले.
संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे हे एकुण 315 वे वर्ष आहे. दरवर्षी बीडमध्ये पालखी आली की पाऊस पडतो किंवा तेथूनच पावसाळा बीडकरांसाठी सुरु होता असा इतिहास आहे. श्रीक्षेत्र मुक्ताईनगरमधून निघणारी संत मुक्ताबाई यांची पालखी खान्देश, विदर्भ, मराठवाडा असा 600 कि.मी.चा प्रवास करत पंढरपुरला पोहोंचते. वाखरी येथील रिंगण सोहळ्यात बहीण-भावाचे म्हणजेच संत मुक्ताई-संत निवृत्ती-संत ज्ञानोबा यांची भेट घडते.