संजय गांधी, श्रावण बाळ योजनेची यादी संकेत स्थळावर उपलब्ध

बीड । निवेदक

बीड तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेची दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये दिनांक 26 ऑगस्ट 2023 ते 19 नोव्हेंबर 2023 या कालावधीत संबंधित कार्यालयास प्राप्त झालेले संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ निराधार अनुदान योजनेचे एकूण 627 अर्ज प्रलंबित होते. सदरचे अर्ज दिनांक २० नोव्हेंबर 2023 रोजीच्या बैठकीमध्ये उचित निर्णयासाठी सादर करण्यात आले होते. त्यानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ निराधार अनुदान योजनेचे मंजूर अर्ज एकूण 205, नामंजूर अर्ज एकूण 183 त्रुटीचे अर्ज एकूण २३९ निर्णय घेण्यात आलेला आहे. सदरची यादी जिल्हाधिकारी बीड यांच्या संकेतस्थळावर https://www.beed.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व संबंधित अर्जदारांनी याची नोंद घ्यावी. असे तहसीलदार सुहास हजारे यांनी कळविले आहे.

Leave a comment