माजलगाव । प्रतिनिधी
श्री क्षेत्र मंजरथ (ता. माजलगाव, जि. बीड) येथे श्री चिन्मयमूर्ती संस्था, उमरखेड यांच्या वतीने सहस्त्र ब्राह्मण भोजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम सोमवार, दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात येणार असून, या निमित्ताने वैदिक परंपरेनुसार धार्मिक विधी, मंत्रोच्चार व त्यानंतर सहस्त्र ब्राह्मणांना सन्मानपूर्वक भोजनदान केले जाणार आहे.
या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने परिसरातील भाविक, मान्यवर व ब्राह्मण बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती अपेक्षित आहे. समाजात धार्मिक संस्कार, एकोपा व अध्यात्मिक जाणीव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
याच दिवशी दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असून, भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.