भोलेनाथबाबांचे अनेक अनुभव महाराजांनी कथेतून विशद

बीड (प्रतिनिधी)- विसाव्या शतकातील महान संत, ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त चाकरवाडी ता. केज जि.बीड येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथा सोहळ्याला आज प्रारंभ झाला. महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या साक्षीने या सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी सिहोर मध्यप्रदेश येथील प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या कथेला अलोट गर्दीने भरभरुन प्रतिसाद देत लाखोंच्या संख्येने भक्तगणांनी उपस्थिती दर्शविली.
पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या प्रभावी शैलीतील शिवमहापुराण कथेतील आरतीत सहभागी होत, हजारो भाविकांबरोबर भक्तिभावाने रममाण झाले. यावेळी प्रदीपजी मिश्रा महाराज यांनी कथेमध्ये अनेक भक्तांना देवांचे देव महादेव यांची भक्ती केल्याने निश्चित फळ येते याच्या प्रत्ययाचे अनुभवच यावेळी वाचून दाखवले व अनुभव आलेल्या उपस्थितांना व्यासपीठावर बोलावले.
पंडित प्रदीप मिश्रा यांचा आश्रम मध्य प्रदेशची राजधानी भोपाळजवळील सिहोर शहरात आहे. त्यांनी येथे 52 एकरात पसरलेल्या कुबेरेश्वर धामची स्थापना केली. गेल्या काही वर्षांत त्यांनी त्यांच्या कथा आणि धार्मिक उपायांद्वारे खूप लोकप्रियता मिळवली आहे. यूट्यूबवर त्यांचे जवळपास 60 लाख सबस्क्राइबर्स आहेत.
मंत्री पंकजाताई मुंडे यांची कार्यक्रमाला उपस्थिती
राज्याच्या पर्यावरणीय व वातावरण बदल मंत्री पंकजाताई मुंडे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती महाराजांचे आशिर्वाद घेतले तसेच शिवपुराण कथेतील आरतीला देखील त्यांनी सहभाग नोंदविला त्यामुळे शिवपुराण कथेच्या गर्दीमध्ये आणखीनच भर पडली.