बीड । निवेदक
शेतकर्यांना आपला ऊस बांधावर टाकण्यास भाग पाडून ऊस उत्पादक शेतकर्यांचा छळ करणार्या कारखानदार बजरंग सोनवणे यांना पराभूत करा असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी केले ते प्रचार दौर्यातील मतदाराच्या बैठकीत बोलत होते पुढे बोलताना हिंगे म्हणाले खाजगी कारखानदारी काढून व्यवसाय करत शेतकरी व कामगारांचे लूट करायची आणि आपली स्वतःची घर भरायची अशा मानसिकतेचे उमेदवार बजरंग सोनवणे आहेत 14 ते 15 टक्के रिकवरी असणार्या उसाचे रिकवरी कमी दाखवून साखरेचा मोठ्या प्रमाणात उत्पन्न काढत काळ्या बाजारात साखर विक्री करण्याचे महापाप बजरंग सोनवणे यांनी केले आणि आपले घर भरले. शेतकर्यांच्या खिशातून काढून घेतलेल्या पैशाच्या जोरावर निवडणुका लढवायच्या आशा लबाड आणि लुटारू बजरंग सोनवणे यांना येत्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करून त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची आवश्यकता आहे असे अशोक हिंगे पाटील यांनी सांगितले जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे कारखानेही खूप मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आलेले आहेत मात्र कारखानदाराच्या उदासीनते मुळे अनेक कारखाने बंद आहेत जिल्ह्यात फक्त तीन कारखाने सुरू आहेत दोन सहकारी आणि बजरंग सोनवणे यांचा येडेश्वरी प्रायव्हेट
याचाच फायदा घेत बजरंग सोनवणे यांनी शेतकर्यांचा छळ केला अनेक शेतकर्यांना आश्वासन देऊन त्यांचा ऊस नेला नाही अनेक शेतकर्यांना आपला ऊस बांधव टाकावा लागला अशा लबाड शेतकर्यांच्या लूट आणि छळ करणार्या बजरंग सोनवणे यांना येत्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करून त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची गरज असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी व्यक्त केले. प्रत्येक गावात उत्साहात त्यांचे स्वागत व सत्कार केला जात आहे.