अॅड.गणेश एम.कोल्हे यांचा युक्तीवाद
बीड । निवेदक
मौजे शिरसदेवी ता.गेवराई येथे दि.10/11/2023 रोजी महादेव मारुती गावडे यांनी व जमीनीचा वाद बीड येथील न्यायालयात प्रलंबित असतांना सरला पाराजी काळे , कस्तुराबाई आबासाहेब ढोरमारे, हरिदास माणिक गावडे, आश्राबाई हरिदास गावडे, रामेश्वर हरिदास गावडे, गोदावरी भास्कर गावडे, भास्कर भगवान बनसोडे, पाराजी आश्रुबा काळे, भागवत आबासाहेब ढोरमारे व अमोल पाराजी काळे यांचा मौजे शिरसदेवी येथील शंकर नागोराव रुचके यांच्या नावे असलेल्या एकत्रित कुटूंबातील जमीनी मिळकतीबाबत माहिती देवून गु.र.नं.297/2023 अन्वये पोलीस स्टेशन तलवाडा येथे भा.दं.वि.कलम 307, 324, 504, 506 तसेच 143, 147, 148 व 149 अन्वये गुन्हा नोंद केला. सदरील गुन्ह्यातून बीड न्यायालयातील मा.जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपी यांनी विधीज्ञ अॅड.गणेश एम.कोल्हे, रा.गेवराई यांच्या वतीने अटकपुर्व जामीन मिळणेबाबत अर्ज दाखल केला. व सदर अर्ज च्या अनुषंगाने आरोपीच्या वतीने विधीज्ञ अॅड.गणेश एम.कोल्हे यांचा युक्तीवाद गृहीत रेकॉर्डअन्वये नोंद करुन आरोपीस अटकपुर्व जामीन मंजूर केला.
याबाबत माहिती अशी की, बीड न्यायालयात दावा न्याय प्रविष्ट असतांना व आरोपींच्या हक्कामध्ये जैसे थे चे आदेश न्यायालयाने पारित केलेेले असतांना दरम्यानच्या कालावधीत फिर्यादी महादेव मारुती गावडे याने वरील व्यक्तीविरुद्ध जमीनीच्या वादातून गुन्हा तलवाडा पोलीस स्टेशन येथे नोंद केला. वास्तविक पाहता घटनास्थळ दर्शविलेली जमीन ही शंकर नागोराव रुचके यांचे एकत्रित कुटूंबातील मुली ,वारस आश्राबाई ,कस्तुराबाई, गोदावरी, यशोदा, सरला यांचा अविभक्त हिस्सा मिळकत असून त्याबाबत विशेष दिवाणी दावा क्र.9/2022 हा मा.दिवाणी न्यायाधीश साहेब वरिष्ठ स्तर बीड यांचे न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे असे असतांना देखील बनावट कारण फिर्यादीमध्ये नमूद करुन काहीएक कारण नसतांना खोटे कारण नमूद करुन 307 अन्वये गुन्हा नोंद केला व सदर प्रकरणात विधीज्ञ अॅड.गणेश एम.कोल्हे यांनी कायदेशीर उत्कृष्ट युक्तीवाद केला.