
बीड । निवेदक
बीड लोकसभा निवडणुकीची तयारी करत असतांना प्रस्थापितांकडून राष्ट्रीय नेते यांच्या सभेची तयारी होत आहे म्हणजेच बीडची लोकसभा ही महायुती आणि महाविकास आघाडीसाठी किती प्रतिष्ठेची आहे हे दिसून येते तर बीड येथेच अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या शितल धोंडरे यांच्या कॉर्नर बैठकी व भेटीगाठी दरम्यान दिवसेंदिवस वाढणार्या प्रचंड गर्दीमुळे व भरघोस प्रतिसादामुळे प्रस्थापितांचे टेंन्शन वाढणार असल्याचे पहायला मिळत आहे.
शितल धोंडरे यांनी सामाजिक कार्य करत असतांना महिला अन्यायाविरोधात वाचा फोडली, समाजाची जबाबदारी म्हणून मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले तसेच विद्यार्थ्यांना मदत करत असतांना प्रवेश मिळवून दिले विद्यार्थींनीच्या देखील अडी-अडचणी दुर केल्या तसेच कोरोना काळात अन्नधान्याचे वाटप करुन जनसेवेचे व्रत हाती घेतले.
तसेच यापुर्वी देखील शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी, रस्त्यांचे काम दर्जेदार व्हावे यासाठी शासन दरबारी लढा दिला. तसेच शितल धोंडरे यांचा जनसामान्यांत मोठा संपर्क असून त्या जात-पात न पाहता कोणत्याही व्यक्तीच्या मदतीला धावून येतात अशा त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांनी घेतलेल्या कॉर्नर बैठकीमध्ये त्यांना बीड, गेवराईतील गढीफाटा, जातेगाव, सिरसदेवी, पाडळसिंगी तसेच माजलगाव येथून चांगला प्रतिसाद मिळत असून मतदारांना देखील आता बदल हवा आहे असेच चित्र निर्माण झाले आहे.
शितल धोंडरे यांच्यासाठी त्यांचे सहकारी केदार काटे, धनंजय धोंडरे, कृष्णा धोंडरे, शिवाजी धोंडरे, यादव चैतन्य, आयेशा बागवान ,अशोक चव्हाण, रामेश्वर कोरडे यांच्यासह केज तालुक्यातमध्ये देखील शितल धोंडरे यांचा शालेय जिवनापासून चांगला संपर्क असल्यामुळे ज्ञानेश्वर थोरात यांची टीम कामाला लागली असून शितल धोंडरे यांच्यामुळे प्रस्थापितांचे टेंन्शन वाढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.