शितल धोंडरेंच्या वाढत्या भेटीगाठींमुळे बीड लोकसभेत वाढतेय चुरस!

बीड । निवेदक
बीड येथील अपक्ष उमेदवार तसेच शितल धोंडरे यांनी बीड लोकसभेसाठी अपक्ष अर्ज दाखल केला असून त्यांनी ग्रामदेवता यमाई देवीचे दर्शन करुन जोरदार प्रचार सुरु केला असून त्यांच्या मतदारांशी वाढत्या भेटीगाठींमुळे आणि त्यांचे यापुर्वीचे सामाजिक कार्य चांगले असल्यामुळे बीड मतदारसंघात आणखीनच चुरस वाढलेली दिसून येत आहे.
बीड येथील शितल धोंडरे यांनी बीड लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला असून त्यांनी यापुर्वी सामाजिक कार्य करतांना नागरिकांना केलेले सहकार्य ,शेतकर्‍यांशी असलेली सामाजिक बांधिलकी तसेच मराठा आंदोलनाचा सहभाग आणि अन्याय अत्याचाराविरोधात शासन दरबारी उठवलेला आवाज यामुळे त्यांना कॉर्नर बैठकांमध्ये भेटीगाठी दरम्यान नागरिकांमधून मोठे बळ मिळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शितल धोंडरे यांनी बीडसह जातेगाव, सिरसदेवी, गढी फाटा, पेंडगाव, पाडळसिंगी येथून प्रचाराला सुरुवात करुन मराठा आंदोलकाचे मनोज जरांगे पाटील यांची देखील भेट घेतली तसेच त्यांनी बीडमध्ये सामाजिक कार्य करत असतांना जिव्हाळा बेघर केंद्रात मदत करण्यापासून महागाई, अन्याय अत्याचार विरोधात वेळोवेळी आवाज उठविला आहे त्यामुळे यंदाच्या बीड लोकसभा निवडणुकीत शितल धोंडरे काय करिश्मा करतील याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.

Leave a comment